शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तिची पाठवणी आणि मीही रडलो”, अविनाश नारकरांनी सांगितला त्यांच्या लग्नातील किस्सा, म्हणाले, “विधी, पाठवणी, रडणं…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 5, 2025 | 4:51 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Avinash Narkar cried his own wedding,

स्वत:च्या लग्नात ऐश्वर्याच्या पाठवणीला रडले होते अविनाश नारकर, अभिनेत्याचं भाष्य

मराठी मालिका, चित्रपट व रंगभूमी गाजवणारी प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणून ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर यांना ओळखलं जातं. हे दोघेही गेली अनेक वर्ष मराठी कलाविश्वात कार्यरत आहेत. ऐश्वर्या व अविनाश या दोघांचाही फिटनेस आजच्या तरुणपिढीला लाजवेल असाच आहे. ३ डिसेंबर १९९५ साली ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी लग्नगाठ बांधली. ऐश्वर्या व अविनाश यांच्या सुखी संसाराला २९ वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाला २९ वर्ष पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्या प्रेमातील गोडवा टिकून याचे कारण म्हणजे त्यांचे एकेमककांवर असलेले नितांत प्रेम. याच नितांत प्रेमाचा दाखला म्हणजे अभिनेते अविनाश नारकर ऐश्वर्या यांच्या पाठवणीला रडले होते. (Avinash Narkar cried his own wedding)

अविनाश यांनी स्वत: याबद्दल सांगितलं आहे. इट्स मज्जाशी साधलेल्या संवादात अविनाश यांनी याबद्दल खुलासा केला आहे. अविनाश नारकरांनी त्यांच्या लग्नातील खास आठवण शेअर करत म्हटलं की, “आमच्या वेळी संगीत वगैरे नव्हतं. एका दिवसात लग्न झालं होतं. आता आठवडे-आठवडे आणि पंधरा-पंधरा दिवस लग्न होतात. आमच्यावेळी एका दिवसात लग्न झालं होतं. ऐश्वर्याने मला आधीच सांगितलं होतं की सगळ्या विधी झाल्या पाहिजे. त्यामुळे ते डोंबिवलीवरुन सकाळी लवकर निघाले होते”.

आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेत्री पुष्पलता यांचे निधन, वयाच्या ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कलाकारही हळहळले

पुढे त्यांनी असं म्हटलं की, “आमच्या वेळी आई-वडिलांना लग्नासाठी फार त्रास झाला नाही. आम्ही असंच लग्न केलं. बघितलं, हो म्हटलं आणि मग लगेच एके दिवशी लग्न झालं. ते डोंबिवलीवरुन आणि आम्ही करी रोडवरुन माटुंगाला आलो होते. त्यामुळे एका दिवसात आमचं लग्न झालं. विधी, पाठवणी, रडणं असं सगळं अनुभवलं. ऐश्वर्याच्या पाठवणीला तर मीसुद्धा रडलो होतो”.

आणखी वाचा – वीर पहारियाची खिल्ली उडवण्यावरुन कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण, अभिनेत्याचं पहिल्यांदा भाष्य, म्हणाला, “माफी मागतो आणि…”

दरम्यान, अभिनयाबरोबरच ऐश्वर्या-अविनाश त्यांच्या इन्स्टाग्राम रिल्समुळे चर्चेत असतात. गेली २९ वर्षे दोघांनीही एकमेकांना खंबीरपणे साथ दिली आहे आणि त्यांची ही साथ अजूनही कायम आहे. सध्या ते स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तर ऐश्वर्या यांच्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला.

Tags: avinash narkar and aishwarya narkarAvinash Narkar and Aishwarya Narkar weddingAvinash Narkar cried his own wedding
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Ankita walawalkar Akkalkot visit

लग्नाची पत्रिका घेऊन अंकिता वालावलकर स्वामींच्या चरणी, अक्कलकोटमध्ये होणाऱ्या नवऱ्यासह अन्नसेवा, व्हिडीओने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.