सोशल मीडिया, युट्युबवर सक्रिय असणाऱ्या आणि तरुण वर्गातील लोकांना प्रणित मोरे ही नाव ओळखीचेच असेल. स्टँड-अप कॉमेडियन म्हणून त्याला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. आपल्या अनोख्या शैलीतून विनोदाचं अचूक टायमिंग पकडत प्रणितने स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्याच्या स्टँड-अप कॉमेडीच्या शोला चाहत्यांची चांगलीच गर्दी होते. सोशल मीडियावर त्याचे नाव कायमच चर्चेत राहत असतं. अशातच त्याच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले. सोलापूर येथे स्टँड-अप कॉमेडीचा शो संपल्यावर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ११ ते १२ जणांच्या जमावाने मिळून त्याच्यावर हल्ला केला. याबद्दल त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. (Veer Paharia on Pranit More attack)
अभिनेता वीर पहारियावर केलेल्या विनोदामुळे प्रणित मोरेला सोलापूरमध्ये ११-१२ लोकांच्या गटाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अभिनेता वीर पहारियावर केलेल्या विनोदामुळे आपल्याला मारहाण झाल्याचे स्टँडअप कॉमेडीयन प्रणित मोरेने म्हटलं आहे. वीर हा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. प्रणितवरील हल्ल्यासंदर्भात आता वीरने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. वीर पहारियाने स्वत: पोस्ट शेअर करत “या घटनेशी काहीही संबंध नसून, या हल्लाचा मी तीव्र निषेध करतो” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – ‘हेरा फेरी ३’मध्ये तब्बूही दिसणार? अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण, म्हणाली, “माझ्याशिवाय…”
वीरने त्याच्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “कॉमेडियन प्रणित मोरेबरोबर जे काही घडलं, ते वाचून मला खरंच धक्का बसला आहे. सर्वात आधी मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे ती म्हणजे, या घटनेशी माझा काहीच संबंध नाही. कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा मी तीव्र निषेध करतो. ट्रोलिंगला मी कधीच मनावर घेत नाही. उलट मी हसतो आणि माझ्या टीकाकारांशीसुद्धा नेहमीच प्रेमाने वागतो. कधीही कोणाचं वैयक्तिक नुकसान करण्यास मी प्रोत्साहन देणार नाही किंवा याचं समर्थनदेखील करणार नाही”.
आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेत्री पुष्पलता यांचे निधन, वयाच्या ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कलाकारही हळहळले
पुढे वीर असं म्हणाला की, “माझ्यासारख्या सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्या सहकलाकारावर झालेल्या हल्ल्याचं तर मी अजिबातच समर्थन करणार नाही. प्रणित आणि त्याच्या चाहत्यांना मी एकच सांगेन, या घटनेशी माझा काहीच संबंध नाही. तरीही याबद्दल मी तुमची माफी मागतो. कारण, कोणतीही व्यक्ती हे पात्र करत नाही. या हल्ल्यासाठी जे कोणी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी मी स्वत: लक्ष घालेन. पुन्हा एकदा मनापासून माफी मागतो”.