मराठी मालिका, चित्रपट व रंगभूमी गाजवणारी प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणून ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर यांना ओळखलं जातं. हे दोघेही गेली अनेक वर्ष मराठी कलाविश्वात कार्यरत आहेत. ऐश्वर्या व अविनाश या दोघांचाही फिटनेस आजच्या तरुणपिढीला लाजवेल असाच आहे. ३ डिसेंबर १९९५ साली ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी लग्नगाठ बांधली. ऐश्वर्या व अविनाश यांच्या सुखी संसाराला २९ वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाला २९ वर्ष पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्या प्रेमातील गोडवा टिकून याचे कारण म्हणजे त्यांचे एकेमककांवर असलेले नितांत प्रेम. याच नितांत प्रेमाचा दाखला म्हणजे अभिनेते अविनाश नारकर ऐश्वर्या यांच्या पाठवणीला रडले होते. (Avinash Narkar cried his own wedding)
अविनाश यांनी स्वत: याबद्दल सांगितलं आहे. इट्स मज्जाशी साधलेल्या संवादात अविनाश यांनी याबद्दल खुलासा केला आहे. अविनाश नारकरांनी त्यांच्या लग्नातील खास आठवण शेअर करत म्हटलं की, “आमच्या वेळी संगीत वगैरे नव्हतं. एका दिवसात लग्न झालं होतं. आता आठवडे-आठवडे आणि पंधरा-पंधरा दिवस लग्न होतात. आमच्यावेळी एका दिवसात लग्न झालं होतं. ऐश्वर्याने मला आधीच सांगितलं होतं की सगळ्या विधी झाल्या पाहिजे. त्यामुळे ते डोंबिवलीवरुन सकाळी लवकर निघाले होते”.
आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेत्री पुष्पलता यांचे निधन, वयाच्या ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कलाकारही हळहळले
पुढे त्यांनी असं म्हटलं की, “आमच्या वेळी आई-वडिलांना लग्नासाठी फार त्रास झाला नाही. आम्ही असंच लग्न केलं. बघितलं, हो म्हटलं आणि मग लगेच एके दिवशी लग्न झालं. ते डोंबिवलीवरुन आणि आम्ही करी रोडवरुन माटुंगाला आलो होते. त्यामुळे एका दिवसात आमचं लग्न झालं. विधी, पाठवणी, रडणं असं सगळं अनुभवलं. ऐश्वर्याच्या पाठवणीला तर मीसुद्धा रडलो होतो”.
दरम्यान, अभिनयाबरोबरच ऐश्वर्या-अविनाश त्यांच्या इन्स्टाग्राम रिल्समुळे चर्चेत असतात. गेली २९ वर्षे दोघांनीही एकमेकांना खंबीरपणे साथ दिली आहे आणि त्यांची ही साथ अजूनही कायम आहे. सध्या ते स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तर ऐश्वर्या यांच्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला.