यंदाचा दिवाळी सण प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांनी अगदी उत्साहात साजरा केला. या कलाकार मंडळींनी दिवाळी साजरी करतानाचे अनेक फोटोस व्हिडीओस चाहत्यांसह शेअर देखील केले. काहींनी पाडव्यानिमित्त खास फोटो शेअर केले तर काहींनी भाऊबीज करतानाचे फोटो शेअर केले. तर अनेकांनी दिवाळीनिमित्त घरी बनलेल्या रुचकर मेजवानीचे फोटो शेअर केले. अशातच निवेदिता सराफ यांच्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. भाऊबीजनिमित्त निवेदिता यांना बनवलेल्या मेजवानीचे ही पोस्ट साऱ्यांच्या पसंतीस पडली आहे. (Nivedita Saraf On Food)
निवेदिता सराफ यांना स्वयंपाकाची प्रचंड आवड आहे. अभिनयक्षेत्रात काम करता करता त्या आपली ही आवड आवर्जून जोपासतात. विविध पदार्थांची रेसिपी शूट करून त्या त्यांच्या युट्यूब चॅनलवर पोस्ट करत असतात. यंदाच्या दिवाळीला निवेदिता यांनी त्यांच्या स्वतःच्या हाताने रुचकर असा फराळही बनवला होता. आणि त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेला हा फराळ अशोक सराफ यांना खावू घातला. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी त्यांनी हा व्हिडीओ शेअर देखील केला होता. यावेळी अशोक मामांनी निवेदिता यांनी केलेल्या फराळाचं कौतुकही केलं.
त्यानंतर आता भाऊबीजनिमित्त निवेदिता यांनी शेअर केलेला व्हिडीओ साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. भाऊबीजचं औचित्य साधत निवेदिता यांनी स्वतःच्या हाताने घरीच स्वयंपाक केला आहे. यानिमित्त त्यांनी खास असा बेत केलेला पाहायला मिळतोय. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये निवेदिता म्हणत आहेत की,”आजचा भाऊबीजेचा बेत आहे शेवबटाटा पुरी, दही बटाटा पुरी,रगडा पॅटिस, पाणी पुरी आणि त्याचबरोबर मस्तपैकी हैद्राबादी दम चिकन बिर्याणी आणि थोडीशी व्हेजिटेबल बिर्याणी”. व्हिडिओमध्ये त्यांनी बनवलेले रुचकर पदार्थ पाहायला मिळत आहेत.
“मला जेवण करून लोकांना खायला घालायला खूप आवडतं. अनेकजण माझ्या घरी मी बनवलेले पदार्थ चाखून जातात. त्यामुळे मी केलेला स्वयंपाक चांगला होत असावा असं मला वाटतं”, असं त्यांनी अनेकदा मुलाखतींमध्ये ही म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर स्वयंपाकाची आवड त्या बऱ्याचदा मालिकांमधील भूमिकांमध्येही पूर्ण करताना दिसतात.