झी मराठीवरील प्रसिद्ध कार्यक्रम म्हणजे खुपते तिथे गुप्ते तब्बल १० वर्षांनी हा कार्यक्रम पुन्हा एकदा पडद्यावर येत आहे. त्या निम्मित गायक अवधूत गुप्ते सवर्त्र या कार्यक्रमाचं प्रमोशन करताना दिसत आहे. खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमाच्या पहिल्या भागात मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे त्या संदर्भात अनेक प्रोमोज चांगलेच वायरल होताना दिसतायत.(Avadhoot Gupte Politics)
मला ही गोष्ट जास्त खुपते…(Avadhoot Gupte Politics)
या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना अवधूत गुप्ते यांनी इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत मराठी चित्रपट सृष्टीतील त्यांना खुपणारी गोष्ट कोणती या गोष्टी बाबत खुलासा केला आहे. सर्वाना खुपणारे प्रश्न विचारणाऱ्या अवधूत यांना मराठी इंडस्ट्रीतील कोणती गोष्ट जास्त खुपते या प्रश्न विचारल्यावर उत्तरादखल ते म्हणाले “वर्षाला २०० चित्रपट येतात मराठी माणूस नक्की किती चित्रपट बघणार ? त्यामुळे आमची इंडस्ट्री लॉस मध्ये आहे. चित्रपट काढणं आणि तो योग्य वेळी प्रदर्शित करणं याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे त्यामुळे लोकांना चित्रपट कोणता पाहावा या बाबतीत संभ्रम उरणार नाही.
पुढे अवधूत गुप्ते यांच्या राजकारणातील प्रवेश बाबतही त्यांनी खुलासा केला. समाजासाठी काहीवर्षे द्यययाला हवीत, समाजासाठी काही हिताच्या गोष्टी करायला हव्यात या दृष्टीने हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे असं ते म्हणाले. खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम रविवार ४ जून पासून सुरु होणार आहे.(Avadhoot Gupte Politics)