शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“वडील गेल्यानंतर माझी आईही अरुंधतीसारखी…”, ‘आई कुठे…’च्या ट्रोलिंगबाबत बोलताना अनघाचं वक्तव्य, म्हणाली, “खूप भयंकर…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 15, 2024 | 3:58 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ashwini mahangade reacted on aai kuthe kay karte serial new twist

"वडील गेल्यानंतर माझी आईही अरुंधतीसारखी…", 'आई कुठे…'च्या ट्रोलिंगबाबत बोलताना अनघाचं वक्तव्य, म्हणाली, "खूप भयंकर…"

सध्या मालिका विश्वात एकाच मालिकेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे ती मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका. गेली साडेचार वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. मालिकेत याआधी अनेकदा अनेक वेगवेगळे ट्विस्ट्स आले आहेत. यावेळी प्रेक्षकांनी प्रत्येक ट्विस्टवर त्यांची सकारात्मक व नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मात्र मालिकेत नुकताच एक नवीन ट्विस्ट आला आहे, ज्यावर प्रेक्षक नाराज आहेत.

मालिकेत नुकतेच आशुतोषचे निधन झाल्याचे दाखवण्यात आले आहे. याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. मात्र, मालिकेत आलेले हे धक्कादायक वळण प्रेक्षकांना आवडलेले नाही. ‘आई कुठे काय करते’च्या या नवीन प्रोमोवर प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे ही मालिका सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. यावर मालिकेतील कलाकारदेखील त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

यावेळी मालिकेत अनघा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेने उत्तर देत असं म्हटलं की, “या प्रोमोवरील सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रतिक्रिया वाचल्या. आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा आईला आपल्या मुलांची गरज असते आणि मालिकेत तो हा क्षण आहे. मालिकेत आलेले हे नवीन वळण खूपच भयंकर आहे. पण काही जण या ट्विस्टमध्ये स्वत:ला अनुभवत आहेत.”

आणखी वाचा – “सोमीला वाचवा”, पूर्वाश्रमीच्या पतीबाबत राखी सावंतचं वक्तव्य, आदिल खान भडकला, म्हणाला, “जगाने तिच्यापासून…”

यापुढे तिने असं म्हटलं की, “मालिकेत अरुंधतीबाबत दाखवण्यात आलेला हा क्षण माझ्या आयुष्यातही  येऊन गेला आहे. कारण माझे वडील गेल्यानंतर मला असं वाटलं की माझ्या आईलाही आता आमची गरज आहे. तर हेच अरुंधतीच्या आयुष्यातही घडत आहे. त्यामुळे हे खूपच भयंकर आहे.”

आणखी वाचा – मोठी बातमी! अमिताभ बच्चन मुंबईतील रुग्णालयामध्ये भरती, बिग बींची अँजिओप्लास्टीही झाली, आता प्रकृती कशी?

दरम्यान, यापुढे मालिकेतील अभिषेक म्हणजेच अभिनेता निरंजन देशमुखनेही मालिकेतील हे नवीन वळण अगदीच अनपेक्षित असल्याचे म्हटले. तसेच यापुढे मालिकेतील आईचा प्रवास कसा असणार आहे? त्यामुळे प्रेक्षकांसह आम्हीदेखील मालिकेतील नवीन ट्विस्टसाठी उत्सुक आहोत.”     

Tags: aai kuthe kay karteAshwini Mahangdemarathi entertainment newsniranjan kulkarni
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Omkar Gowardhan On Exit

"खूपच जास्त वाईट…", 'आई कुठे…'मधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच आशुतोषने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्याविषयी प्रेक्षकांच्या मनात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.