माणूस म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यात जोडीदाराची जागा ही निश्चित असते. मनातील भाव व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाला आपला असा एक हक्काचा, प्रेमाचा माणूस हवाच असतो. मनोरंजन क्षेत्रात पाहायला गेलं तर अनेक कलाकारांच्या अफेअरच्या चर्चा रंगलेल्या असतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातला जोडीदार नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. आई कुठे काय करते मालिकेतील सरावाची लाडकी, साधीभोळी, संस्कारी अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महागंडे हिच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराचे फोटो नुकतेच समोर आले आहेत.(Ashvini Mahangade Romantic Post)
पहा कोण आहे अश्विनीचा रिअल लाईफ पार्टनर (Ashvini Mahangade Romantic Post)
आई कुठे काय करते या मालिकेतील अनघा म्हणजेच अश्विनीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला. अभिनेत्री अश्विनी महांगडेला या मालिकेतील तिच्या भूमिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. मालिकेबरोबरच अश्विनी चित्रपटातूनही अधूनमधून भेटीस येत असते. नुकतीच तिची भूमिका असलेला महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अश्विनी तिच्या पारंपारिक वेशातील फोटोशूटमुळे विशेष चर्चेत असते. अश्विनीला गावाकडची ओढ आहेच हे तिच्या फोटोज वरून कळते.
अश्विनी गावाकडचे खासकरून त्यांच्या शेतात काम करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहतेही अश्विनीच्या या फोटोंवर लाईक्स कमेंटचा वर्षाव करत असतात. अश्विनीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोशूटमुळे सध्या अश्विनी चर्चेत आली आहे. अश्विनीने तिच्या खऱ्या आयुष्यातलत्या जोडीदाराचे फोटो शेअर केले आहेत.(Ashvini Mahangade Romantic Post)
हे देखील वाचा – ‘आम्ही सर्वच खचून गेलो, पण तिने करून दाखवलं’ कार्तिक आर्यनची भावुक पोस्ट
“आधार देणाऱ्याचे मन निर्मळ असावे आणि ते अनेक संकटांमधून गेल्यावरच समजते…” असे कॅप्शन देत अश्विनीने पोस्ट शेअर केली आहे. तिला आधार देत कायम तिची साथ करणाऱ्या या तिच्या जोडीदाराचे नाव आहे नीलेश जगदाळे. नीलेश हे फार्मफ्रेश ऑरगॅनिक फ्रेशचे मालक आहेत. याबरोबरच त्यांनी अश्विनीसोबत मिळून ‘फ्लाइंग एन्जल लेट्स फ्लाय’ ही कंपनी देखील सुरू केली आहे. तसेच ‘रयतेचे स्वराज्य’ प्रतिष्ठानचे ते सदस्यही आहेत तिथे अश्विनीही सदस्य आहे.