अभिनेता,दिग्दर्शक, निर्माता एक उत्तम वडील आणि उत्तम आजोबा एका माणसामध्ये किती गुण असावेत. असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे महेश कोठारे. अनेक धडाकेबाज चित्रपट त्यांनी सिनेसृष्टीला दिले आहेत. अनेक उत्तम प्रोजेक्ट त्यांच्या नावावर कोरले गेले आहेत. कोठारे आणि लक्ष्या ही अजरामर जोडी या चित्रपटांमुळे मिळाली.(Mahesh Kothare Aamir khan)
कोणताही चित्रपट, मालिका, नाटक जितक्या सोप्या पद्धतीने आपल्याला पडद्यावर बघताना दिसतात . तितकेच अथक परिश्रम त्या पडद्याच्या मागे असतात.आणि तो एखादा चित्रपट किंवा मालिका किती यश मिळवू शकणार आहे याची खात्री कोणालाच नसते. उभा केलेला डोलारा कधी ही कोसळू शकतो ही भीती कायम तिथे काम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात असते.
पाहा नक्की काय घडलं.(Mahesh Kothare Aamir khan)
अशाच महेश कोठारेंच्या एका चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी या विषयी भाष्य केले आहे. ‘लो में आगया’ हा चित्रपट म्हणजे त्यांच्या नावावर लिहलं गेलेलं खूप मोठं अपयश आहे. असं त्यांनी म्हंटल आहे. मासूम या एका हिंदी चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी त्यांचा पुढचा हिंदी चित्रपट करायचा ठरवला तो हा होता.या चित्रपटाच्या बाबतीत त्यांच्या नशिबाने त्यांची साथ सुरुवातीलाच सोडली होती. त्यांनी टाकलेले सर्व फासे उलटे पडले होते. या चित्रपटाच्या बाबतीत त्यांची झालेली पहिली चूक ती म्हणजे त्यांनी रिमेक साठी जो चित्रपट निवडला ती निवडच चुकली होती.तेव्हा त्यांनी झपाटलेला या चित्रपटाचं रिमेक करायला हवा होता, परंतु तेव्हा त्यांनी दे दणादण हा चित्रपट निवडला.
दुसरी फसलेली गोष्ट, या चित्रपटाचा नायक म्हणून कोठारेंना अमीर खान याला घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी बरीच वाट पहिली, अनेक गोष्टी त्यांनी सांभाळून घेतल्या त्या काळात अमीर खान सोबत त्यांचे चांगले संबंध निर्माण झाले. परंतु त्या काळात अमीर कथानकाच्या बाबतीत अमीर फारच निवडक होते म्हणून त्यांनी कोठारेंना नकार दिला. परंतु त्यांनी कथानकात बदल करायला कोठारेंना मदत करण्याचे आश्वासन दिले. जशी आहे तशी कथा घेऊन कोठारेंनी पुढे जाऊ नये असे आमिरचे मत होते. परंतु आमिरने दिलेल्या नकारामुळे ही गोष्ट कोठारेंनी इगो वर घेतली. (Mahesh Kothare Aamir khan)
हे देखील वाचा : “मोठी गाडी नाही म्हणून आदिनाथला वाटायची लाज”
त्या नंतर त्यांनी नवीन कलाकार घेऊन हा चित्रपट करायचं ठरवलं,तेव्हा त्यांना कोणीतरी अभिनेता गोविंदाचा भाचा विनय आनंद याच नाव सुचवलं. म्हणून त्यांनी त्याला भेटायला बोलवलं त्यांना तो आवडला त्यांनी चित्रपटासाठी त्याची निवड केली. त्या मुळे त्या काळात गोविंदासोबत त्यांचे चांगले संबंध निर्माण झाले. हळू हळू एक एक कलाकार ठरत गेले. परंतु अमीर चित्रपट करत नसल्या मुळे. आर्थिक दृष्टया चित्रपट उभा करणं फार कठीण झालं होत. या चित्रपटासाठी त्यांना त्यांचं घर गहाण ठेवावं लागलं.हा चित्रपट बनवायला त्यांना जवळ जवळ पावणे तीन कोटी इतका खर्च आला. दोन-तीन वर्ष इतका वेळ हा चित्रपट बनवायला लागला. (Mahesh Kothare Aamir khan)
हे देखील वाचा : म्हणून नाकारल्या होत्या मृणाल यांनी अनेक मराठी मालिका- वाचा नक्की काय घडलं होत
या चित्रपटाच्या वितरणाच्या वेळी ही कोठारेंची सर्व गणित चुकली होती.आणि प्रेक्षकांनी पहिल्या शो पासून या चित्रपटाकडे पाठ फिरवली होती आणि कारकिर्दीमधल्या सर्वात मोठ्या अपयशाची नोंद त्यांच्या नावावर झाली. तेव्हा अमीर खानने नकार दिला म्हणून कोठारेनं वाईट वाटलं होत, राग आला होता परंतु आमिरचा तो सल्ला ऐकलं असता तर इतकं मोठं अपयश टळलं असत. अर्थात नंतर या जर तरला काहीच अर्थ उरत नाही.परंतु त्यांना त्यांची चूक जाणवली आणि ती मान्य केली हे नक्कीच कौतुकास्पद आहे.