मराठी सिनेसृष्टीतील दमदार व्यक्तिमत्व म्हणून अभिनेते अशोक सराफ यांच्याकडे पाहिलं जात. आजही तितक्याच ताकदीने अभिनयाची धुरा पेलवणाऱ्या अशोक सराफ यांनी प्रत्येक भूमिकेला योग्य तो न्याय दिला. विनोदाची उत्तम शैली, अभिनयाचे विविध कंगोरे सांभाळत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. प्रत्येक भूमिकेला योग्य तो न्याय देणाऱ्या मामांनी मात्र एक भूमिका करायला नकार दिला होता, नेमका काय आहे तो किस्सा जाणून घेऊया आजच्या ‘जपलं ते आपलं’ या भागात. (Ashok mama and Dada Kondke)
अभिनयाची आवड असलेले, आणि प्रत्येक भूमिकेला योग्य तो न्याय देणाऱ्या अशोक मामांनी दादा कोंडके यांच्या चित्रपटातील एका भूमिकेला नकार दिला होता. अशोक सराफ यांनी दादा कोंडके यांच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एका चित्रपटादरम्यानचा किस्सा दादा कोंडकेंनी त्यांच्या ‘एकटा जीव’ या आत्मचरित्रामध्ये सांगितलं आहे.
पाहा अशोक सराफ यांनी दादा कोंडके यांच्यासोबत सीन करताना का दिला होता नकार (Ashok mama and Dada Kondke)
‘राम राम गंगाराम’ या चित्रपटात अशोक सराफांनी म्हांदू खाटीक आणि दादा कोडंकेंनी गंगारामची मुख्य भूमिका साकारली होती. एका मुसलमान खाटिकाची भूमिका अशोक सराफ साकारत होते. साधारण टी-शर्ट लुंगी आणि डोक्यावर टोपी असा त्यांचा लूक होता. या चित्रपटात एक सीन होता ज्या सीनमध्ये एक पांढरा उंदीर म्हांदू खाटीकाच्या लुंगीत शिरतो असं काहीस दाखवण्यात आलं आहे. ‘पांढरा उंदीर चावतो’ असा अशोक सराफांचा गैरसमज असल्याने या सीन दरम्यान ते घाबरले होते आणि त्यांनी हा सीन करायला स्पष्ट नकार दिला होता.

त्यानंतर ज्यावेळी दादा कोंडके यांना अशोक मामाचं सीन नाकारण्याचा कारण कळलं तेव्हा दादा कोंडकेंनी अशोक सराफांना तयार केलं आणि त्यांना सीनची आऊटलाईन समजावून सांगितली. या उलट अशोक सराफांनी तो सीन इतक्या चांगल्या पद्धतीने शूट केला की त्या सीनदरम्यान ते घाबरले होते असं कुठेही वाटलं नाही.
हे देखील वाचा – सावधान…. ‘थकाबाई’ येत आहे! शुभंकर व हेमल घेऊन येत आहे एक रहस्यमयी मराठी चित्रपट
दादा कोंडकेंनी त्यांच्या आत्मचरित्रात याचा उल्लेख केला आहे. दादांनी लिहिलंय. “उंदीर लुंगीत शिरलेला सीन अशोकने खूप चांगल्या पद्धतीने केला. अगदी अप्रतिम. तेरे मेरे बीच में मध्ये अमजदलासुद्धा हा सीन जमला नव्हता. त्या सीनची अशोकला मी फक्त आऊटलाईन समजावून सांगितली होती. पण त्याने डोळे फाकून चेहऱ्याचे एक्सप्रेशनने छान अभिनय केला. या चित्रपटात दादा कोंडके मुख्य भूमिकेत होते तरीदेखील अशोक सराफ यांच्या वाटेल मुख्य अभिनेत्याहून अधिक सीन वाट्याला आले होते.
