त्रिकुट हा शब्द आपण ऐकलाच असेल मित्रांच्या घोळक्यात काही मित्रांची आपली आपली एक हक्काची टीम असते ज्यांच्या सोबत राहणं ते पसंत करतात. मग काम कोणतंही असो सगळे हे त्रिकुट एकत्रच असत. असच एक त्रिकुट आपल्या मराठी इंडस्ट्रीत देखील आहे ते त्रिकुट म्हणजे अभिनेते अशोक सराफ, अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री निवेदिता सराफ.प्रेक्षकच काय तर कलाकारानं मंडळींमध्ये देखील हातावर मोजण्याइतकेच लोक असतील ज्यांना लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव माहित नसेल.(Ashok Saraf Laxmikant Berde)

अशोक सराफ नेहमी त्यांच्या लाडक्या ‘लक्ष्या’ सोबतचे किस्से सांगत असतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या हजरजबाबी आणि कोडकर स्वभावाचा असाच एक किस्सा अशोक सराफ यांनी सांगितलं आहे. अशोक सराफ यांनी सांगितलं लक्ष्मीकांत आणि त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. सेटवर त्या दोघं इतकी धमाल मस्ती कोणीच केली नसेल असं मामानी सांगितलेला किस्स्यांवरून लक्ष्यात येत. सेटवर प्रत्येकाची खेचत, प्रत्येकाची मस्करी करत या दोघांची धमाल चाललेली असायची. कित्येकदा या दोघांनी केलेली मस्करी समोरच्याला काही काळ समजतही नसे. धमाल मस्ती करत केलेलं शूटिंग हे नेहमी लक्षात राहत असं मामा म्हणाले.
कधी कधी त्यांच्या या मस्करीच्या जाळयात निवेदिता यांना ही अडकवण्यात आलं आहे.
हे देखील वाचा – आणि निळू फुले दादांना म्हणाले ‘अशोक सराफला घ्या’
बालपणापासून होती मैत्री….(Ashok Saraf Laxmikant Berde)
खरतर अशोक सराफ यांच्या आधी लक्ष्मीकांत बेर्डे आणि निवेदिता सराफ यांची मैत्री बालपण पासूनची होती.लक्ष्मीकांत यांच्या अवलीपण बद्दल सान्गताना अशोक मामानी सांगितलं कि एकदा निवेदिता सराफ यांनी दागिन्यांच्या दुकानात एक हिऱ्याचा हार पाहिला आणि लक्ष्मीकांत यांना त्या म्हणाल्या मला तो हार खूप आवडला आणि पाहताच तो घ्याची इच्छा झाली या वर क्षणाचा विलंब न करता लक्ष्मीकांत मामांकडे आणि एकदा निवेदिता यांच्याकडे बघून म्हणाले ‘बाई, एक लक्षात ठेव, तू चुकीचा सराफ शोधलास’ आणि हे उत्तर ऐकून एकच हशा पिकला.

लक्ष्मीकांत यांचा हाच मिश्किल स्वभाव त्यांना भेटलेला प्रत्येक कलाकार सांगत असतो. जर कोणी आपल्याला विचारलं की मराठी मध्ये विनोद समृद्ध करण्यात कोना कोणाचा महत्वाचा वाटा होता तर ही २ नाव घेतल्याशिवाय ते यादी पूर्णच होऊ शकत नाही एवढं नक्की. अशोक सराफ यांना नुकताच जीवनगौरव हा पुरस्कार जाहीर करण्यात आला या क्षणी जर त्यांचा लाडका लक्ष्या त्यांच्या सोबत असता तर सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता.
हे देखील वाचा – अशोक मामा आणि निवेदिता यांच्या लव्हस्टोरीमध्ये आधीच घडला होता ‘DDLJ’ मधला तो सीन