बॉलिवूडमधील किंग खान, बादशाह म्हणजेच अभिनेता शाहरुख खान. जगभरात शाहरुख खानचे अनेक चाहते आहेत. शाहरुख खानने आजवर आपल्या अभिनयानं रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्याचा फॅन फॉलोविंगही खूप मोठा आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःच्या हिमतीवर शाहरुखने आपले नाव कमावले आहे. शाहरुख आणि ऐश्वर्या रायने एक काळ चांगलाच गाजवला. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं. मिस वर्ल्ड झाल्यामुळे चित्रपटसृष्टीने ऐश्वर्याला सुरुवातीला रेड कार्पेट ट्रीटमेंट दिली असली तरी यांत तिच्या मेहनतीचा अमूल्य वाटा आहे. (Shahrukh Khan Aishwarya Rai)
मन्सूर खानच्या ‘जोश’ मध्ये ऐश्वर्याने शाहरूख खानच्या जुळ्या बहिणीची भूमिका केली होती. त्या चित्रपटातील त्या दोघांची जोडी लक्षणीय होती. ‘जोश’मध्ये बहीण-भावाची भूमिका करणाऱ्या याच ऐश्वर्या-शाहरूखने नंतर ‘शक्ती’ मधला ‘आयटेम डान्स’, ‘मोहोब्बतें’, ‘देवदास’, ‘ऐ दिल हैं मुश्किल’सारख्या चित्रपटांत नायक-नायिकेच्या भूमिका रंगवल्या होत्या.
पहा काय घडलं होत ऐश्वर्या सोबत (Shahrukh Khan Aishwarya Rai)
आणखी एक ऐश्वर्या आणि शाहरुख खानच्या चित्रपटाबाबतचा एक किस्सा समोर आला आहे, ‘चंदेरी सोनेरी’ या पुस्तकात लेखिका ललिता ताम्हणे यांनी हा किस्सा सांगितला आहे. खरं तर, आणखी एका चित्रपटात ऐश्वर्या शाहरूखची नायिका म्हणून काम करत होती. तो चित्रपट होता- ‘चलते चलते’. ‘चलते चलते’च्या पहिल्या शेड्यूलसाठी एक सेट उभारण्यात आला होता. शूटिंगला सुरुवातही झाली होती. आणि अचानक, एका संध्याकाळी सलमान खान त्या सेटवर येऊन पोहोचला होता.
काही कारणांमुळे त्याच्या आणि ऐश्वर्याच्या मैत्रीत दुरावा आल्यामुळे तो संतापलेला होता. त्याने रागाच्या भरात ‘चलते ‘चलते’च्या सेटवर म्हणे बराच गोंधळ घातला होता. इतकंच नव्हे, तर त्याने सेटचंही खूप नुकसान केलं होतं. त्यामुळे वैतागलेल्या शाहरूखने पुन्हा असा प्रकार होऊन नुकसान सोसायला लागू नये, म्हणून ऐश्वर्यालाच त्या चित्रपटातून काढून टाकलं होतं. ऐश्वर्याची स्वतःची काहीही चूक नसताना तिला ‘चलते चलते’ हा चित्रपट गमवावा लागला होता.(Shahrukh Khan Aishwarya Rai)
हे देखील वाचा – विक्षिप्त स्वभाव आणि खोटी साक्ष दिल्यामुळे जेल
शाहरूखने नंतर काजोलला विचारलं. पण अशा प्रकारे ऐश्वर्याला काढून टाकणं न पटल्यामुळे काजोलने नकार दिला. मग शाहरूखने राणी मुखर्जीला विचारलं. राणी तेव्हा चित्रपटसृष्टीत तशी नवीनच होती. शाहरूखला नकार देणं तिला शक्यच नव्हतं. मुख्य म्हणजे तिला तेव्हा चांगल्या चित्रपटाची गरजही होती. तिने चटकन होकार दिला आणि ‘चलते चलते’ चित्रपटात पुन्हा एकदा शाहरूख- राणीची जोडी यशस्वी ठरली. पण ऐश्वर्याचा मोठेपणा म्हणजे, तिने कधीही या खऱ्या गोष्टीची जाहीर वाच्यता केली नाही.