संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नव वर्षाचा सोहळा दिमाखात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा गुढी पाडव्याचे औचित्य साधत करत असलेला सोहळा कायमच खास असतो. मुंबईतला गुढीपाडवा म्हणजे गिरगांवची शोभायात्रा. नवववर्षाचे दणक्यात आगमन म्हणजे गिरगांवची शोभायात्रा. वर्षभर हा दिवस साजरा करण्यासाठी प्रत्येकजण वाट पाहत असतो. फक्त गिरगांवकरच नाही तर संपूर्ण मुंबईकर या शोभायात्रेला आवर्जून हजेरी लावतात.(girgaon shobhayatra)
गॉगल्स हे शोभायात्रेचे खास वैशिष्ट्य. आणि सोबत पारंपरिक पेहराव आलाच. या शोभायात्रेत प्रत्येकाच्या लूकने आणखीनच शोभा येते. या शोभायात्रेतलं आणखी वैशिष्ट्य म्हणजे इथे येणाऱ्या कलाकारांची मांदियाळी. छोट्या, मोठया पडद्यावर दिसणारे हे कलाकार त्यांच्या बिझी श्येडुल मधून वेळात वेळ काढून नेहमीच शोभायात्रेला हजेरी लावतात. त्यांच्या येण्याने तर शोभायात्रेला चारचाँद लागतात. यंदाच्या म्हणजे २०२३च्या गिरगांवच्या शोभायात्रेला काही कलाकारांनी उपस्थति लावली. त्यांचा तो पारंपारिक पेहराव या शोभायात्रेची रंगत वाढवणारा होता.
पहा गिरगांवच्या शोभायात्रेत कलाकारांचा खास लूक (girgaon shobhayatra)

अभिनेत्री रुपाली भोसले आणि अभिनेते मिलिंद गवळी हे दोघे आई कुठे काय करते मालिकेत एकत्र पाहायला मिळतात, त्यांची ही जोडी गिरगांवच्या शोभायात्रेला उपस्थित होती. रुपालीचा नववारी स्पेशल लूक आणि नाकात नथ असलेला हा तिचा लूक विशेष भावतोय. तर मिलिंद गवळी यांचा पैठणीतील धोतर, सदऱ्यातील लूक उठून दिसतोय.
====
====

महाराष्ट्राची अप्सरा म्हणून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनालीनेही निळया रंगाच्या भरजरी साडीत नटून थाटून मराठमोळ्या वेशात गिरगांवच्या शोभायात्रेला उपस्थिती लावली.

तर अभिनेत्री कुंजिका चा इंडो वेस्टर्न लूक आणि सोबत अभिनेता अभिजित खांडकेकरचा पारंपारिक लूक शोभायात्रेत लक्षवेधी ठरला.(girgaon shobhayatra)

ढोलताशांच्या गजरात पारंपारिक कपडे परिधान करुन नववर्षाचं स्वागत करण्यास ही मंडळी उत्सुक असलेली पाहायला मिळतात.
