ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी मराठी सिनेविश्वात आपल्या अभिनयाची उत्तम छाप उमटवली. सिनेविश्वातच नव्हे तर नाट्यविश्वात आणि मालिकाविश्वातही वंदना गुप्ते यांनी उत्तम कामगिरी केली. मराठी मालिका, नाटक, चित्रपट यातून बऱ्याच नावाजलेल्या कलाकृती या वंदना गुप्ते यांच्या नावावर कोरल्या आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. वंदना गुप्ते या सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असतात. नुकतीच सोशल मीडियावर एक आनंदाची पोस्ट करत त्यांच्या चाहत्यांना त्यांनी गुडन्यूजचं दिली आहे. त्यांनी पुन्हा एकदा लगीनगाठ बांधली आहे. (vandana gupte)
पहा वंदना गुप्ते यांची खास पोस्ट (vandana gupte)
लग्नाच्या ५० व्या वाढदिवशी वंदना गुप्ते यांनी पती शिरीष गुप्ते यांच्या सोबत विवबंधनात अडकल्या. या आनंदी सोहळ्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत सर्वांना गोड बातमी दिली आहे. वंदना गुप्ते आणि शिरीष गुप्ते यांनी लग्नाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा छोटेखानी विवाह सोहळा उरकला. सर्व कुटुंबियांच्या साक्षीने त्यांचा हा विवाहसोहळा संपन्न झाला. संपूर्ण कुटुंबियांच्या साक्षीने या जोडप्याने एकमेकांना वरमाला घातल्या. या खास क्षणाची व्हिडीओ आणि काही खास फोटो शेअर करत याबाबतची कल्पना वंदना गुप्ते यांनी सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली.
या व्हिडीओ आणि फोटोंसह त्यांची खास पोस्ट यावेळी लक्षवेधी ठरली. या पोस्टमध्ये त्यांनी असे लिहिले की, ‘आमच्या लग्नासाठी माझी वहिनी अमेरिकेहून आली, माझी भाची कॅनडाहून आली, माझी लेक स्वप्ना वेस्ट इंडिजवरून आली. या खास दिवशी हे सगळे आमच्या आनंदात सहभागी झाले. त्यांनी घरीच लग्नाची तयारी केली. यानिमित्त आम्हा दोघांना ते अविस्मरणीय क्षण पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. सर्वाधिक आनंद याचाच होता की आमची मुलं आमच्या लग्नाला हजर होती. आमच्या आनंदात सहभागी होऊन आमचा हा दिवस खास बनवल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. अशी आभार व्यक्त करणारी पोस्ट वंदना गुप्ते यांनी केली. (vandana gupte)
====
हे देखील वाचा – अमिताभ बच्चन यांच्यामुळे या दोन जिवलग मित्रांमध्ये पडली फूट
====
त्यांच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी त्यांना लग्नाच्या ५०व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर नेटकऱ्यांनीही कमेंट करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.