Arjun Kapoor On Disease : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. विशेषतः अर्जुन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिलेला पाहायला मिळाला आहे. तसेच अभिनेता त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेला दिसला. ‘कुत्ते’, ‘द लेडी किलर’ आणि ‘एक व्हिलन रिटर्न्स’ फ्लॉप झाल्यानंतर आता अर्जुनचा ‘सिंघम अगेन’ बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरत आहे. अशा परिस्थितीत अर्जुन मीडियाशी बोलत संवाद साधताना दिसत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुनने मानसिक आरोग्याविषयी केलेलं भाष्य धक्कादायक होतं. अभिनेत्याने सांगितले की, तो हाशिमोटो नावाच्या आजाराने ग्रस्त आहे.
‘द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन म्हणाला, “जेव्हा तुमचे चित्रपट चालत नाहीत, तेव्हा तुम्ही स्वतःवरच संशय घेऊ लागता. माझ्या बाबतीतही असेच घडले. मी असा व्यक्ती आहे ज्याचे संपूर्ण आयुष्यचं चित्रपट आहे. मी चित्रपटांचा आनंद घेणे बंद केले आणि मी अचानक इतर लोकांचे काम बघू लागलो. त्यावेळी मी स्वतःला विचारु लागलो, “मी हे करु शकेन का की मला संधी हे करण्याची संधी मिळेल का?”. काही वेळाने मला समजले की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग मी थेरपी सुरु केली.
आणखी वाचा – रिचा चड्डा व अली फजलने ठेवलं लेकीचं नाव, अर्थ आहे फारच वेगळा, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
अर्जुन पुढे म्हणाला, “मी थेरपी सुरु केली. काही थेरपिस्टकडे गेलो, पण काही फायदा झाला नाही. मग मला बोलू देणारा माणूस सापडला. त्याने सांगितले की मी डिप्रेशनमध्ये आहे. मी याबद्दल कधीही उघडपणे बोललो नाही, परंतु मला हाशिमोटो (थायरॉईडला नुकसान करणारा स्वयंप्रतिकार रोग) देखील आहे. असे होते की जर मी विमानाने प्रवास करत आहे आणि माझ्या मनाला मला काही धोका आहे असे वाटत असेल तर माझे वजन वाढू लागते.
आणखी वाचा – प्रियांका चोप्राची लेक आहे फारच हुशार, दोन वर्षाची मालती शिकत आहे डान्स, ‘ते’ दृश्य पाहून नेटकरीही हैराण
वयाच्या ३० व्या वर्षी मी या आजाराला सामोरे गेलो आहे. ३०व्या वर्षीपासून हा आजार मला सतावू लागला. इतकंच नाही तर हा आजार माझ्या आईला व माझ्या बहिणीला सुद्धा आहे”.