शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : वडिलांच दुसरं लग्न अन् लेकाचा भन्नाट परफॉर्मन्स; अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा, व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 25, 2023 | 4:05 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
arhaan khan stunning performance in his father arbaaz second marriage video viral on social media

Video : वडिलांच दुसरं लग्न अन् लेकाचा भन्नाट परफॉर्मन्स; अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा, व्हिडीओ व्हायरल

मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नाची लगबग सुरु असल्याची पाहायला मिळत आहे. नुकताच अभिनेत्री गौतमी-स्वानंद यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. तर स्वानंदी व आशिष यांचा विवाह लवकरच पार पडणार आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता अरबाज खानही लग्नबंधनात अडकला आहे. काल २४ डिसेंबर रोजी अरबाज व शुरा दोघेही विवाहबंधनात अडकले. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच एका व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. (Arhaan’s Video On Instagram)

अरहानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अरहानने वडिलांच्या लग्नात गिटार वाजवल्याचे पाहायला मिळाले. अरहान गिटार वाजवत असताना त्याचे वडील अरबाज अरहानला कॅमेऱ्यात कैद करतानाही दिसला. अरबाजने स्वत:च्या मोबाईलमध्ये आपल्या लेकाचा खास व्हिडीओ काढला आहे. तसेच अरहानने या लग्नात डान्सही केला. अरहानचा हा गिटार वाजवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – बहिणीची लग्नगाठ बांधताना मृण्मयीने घेतला खास उखाणा, म्हणाली, “आयुष्यभरासाठी बांधली…”

अरबाज व शुरा खान यांच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक मोठ्या स्टार्सनी हजेरी लावली होती. तसेच या लग्नसोहळ्याला त्याचे जवळचे कुटुंबीय व मोजकाच मित्रपरिवार उपस्थित होता. अरबाज-शुरा यांचा हा विवाहसोहळा पार पडताच अरबाजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लग्नानंतरचा पहिला फोटो शेअर करत त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. अरबाज व शूरा यांच्या फोटोवर चाहत्यांसह बॉलिवूडमधील अनेक कलाकार मंडळींनी लाईक्स व कमेंट्स करत तुफान प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – पेस्टल रंगाचा पोशाख, टेम्पल ज्वेलरी अन् मोत्यांच्या मुंडावळ्या; गौतमी-स्वानंदच्या लग्नाचा लूक ठरतोय लक्षवेधी

अरबाजने लग्नात खास पोशाख परिधान केला होता. त्याने फुलांच्या डिझाईन असलेला कोट व त्यावर सोनेरी रंगाची पॅंट परिधान केली होती तर, शुरानेही अरबाजच्या कपड्यांना साजेसा असा पेस्टल रंगाचा गुलाबी लेहेंगा व त्यावर सोनरी रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता. तसेच “आमच्या प्रियजनांच्या उपस्थितीत, मी व माझी मैत्रीण आजपासून कायमचे एकत्र झालो आहोत. या खास दिवशी मिळालेल्या तुमच्या प्रेम व आशीर्वादासाठी धन्यवाद.” असं म्हणत अरबाजने हे खास फोटो शेअर केले आहेत.

Tags: arbaaz khanarbaaz khan weddingbollywood newsentertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
animal fame bollywood actor ranbir kapoor and alia bhatt revealed daughters raha photo viral on social media

आलिया-रणबीरची चाहत्यांना खास भेट, ख्रिसमसचे औचित्य साधत दाखवला लेकीचा चेहरा, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.