बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुला गमावल्याचं दुःख…”, काही महिन्यांपूर्वी निधन झालेल्या भावासाठी अपूर्वा नेमळेकरची पोस्ट, म्हणाली, “खूप लवकर गेलास आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 7, 2023 | 4:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Apurva Nemlekar brother death

“तुला गमावल्याचं दुःख...”, काही महिन्यांपूर्वी निधन झालेल्या भावासाठी अपूर्वा नेमळेकरची पोस्ट, म्हणाली, “खूप लवकर गेलास आणि...”

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नावारुपाला आली. ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी झाल्यानंतर तिच्या चाहतावर्गामध्ये आणखीनच भर पडली. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. कलाक्षेत्रात पुढे जात असताना काही महिन्यांपूर्वी अपूर्वा व तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अपूर्वाचा धाकटा भाऊ ओमकार नेमळेकरचं निधन झालं. भावाच्या निधनानंतर अपूर्वा पूर्णपणे कोलमडून गेली होती. आता तिने भावासाठी भावुक पोस्ट शेअर केली आहे.

एप्रिल महिन्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे ओमकारचं निधन झालं. तो अवघ्या २८ वर्षांचा होता. ओमकारचा ७ ऑक्टोबरला वाढदिवस असतो. याचनिमित्त अपूर्वाने त्याच्याबरोबरचे काही फोटो पोस्ट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच ओमकारच्या वाढदिवसाला करत असलेली मजा-मस्ती तिने सगळ्यांपर्यंत शेअर केली. यावेळी भावाची सतत आठवण येत असल्याचंही अपूर्वा म्हणाली.

आणखी वाचा – Video : याला म्हणतात देशमुखांच्या सूनेचे संस्कार, रस्त्यावरील मुलं भेटायला आल्यावर जिनिलियाने काय केलं पाहा, व्हिडीओ व्हायरल

अपूर्वाने म्हटलं, “प्रिय ओम, दरवर्षी ७ ऑक्टोबर हा दिवस मजेशीर आणि उत्साहाने भरलेला असायचा. आपल्या बालपणी तुझ्या वाढदिवसादिवशी घरीच केक बनवण्याची तयारी, कपडे खरेदी करणं, सजावट याची धावपळ असायची. जसजसे आपण मोठे होत गेलो तसं आवडत्या हॉटेलमध्ये जाऊन खायचं आणि धमाल करायची. यादरम्यान खूप मजा आली. आपण आठवणींचा अल्बम बनवला. पण तू खूप लवकर स्वर्गामध्ये गेलास. तुझ्याशिवाय आयुष्य अपूर्ण आहे”.  

आणखी वाचा – Video : ओंकार भोजनेने ‘तू दूर का?’ गाणं गाताच भर कार्यक्रमात नम्रता संभेरावला कोसळलं रडू, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  

View this post on Instagram

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

“मला आशा आहे की, स्वर्गामधून तू आमच्याकडे हसतमुखाने बघत असशील. आज आम्ही तुझ्या आठवणी अधिक जपतो आणि त्यामध्ये रमतो. तुझी आठवण येणं सोपं आहे. पण तुला गमावल्याचं दुःख कधीच कमी होणार नाही. माझ्या प्रिय भावा, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. भविष्यामध्ये एक दिवस तू आणि मी पुन्हा एकत्र येऊ. आम्हाला तुझी खूप आठवण येते. आय लव्ह यू बाळा”. अपूर्वाच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिच्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: apurva nemlekarmarathi actressmarathi moviemarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Mukta Barve angry on Shree Datta Snacks

“कौतुकाने खायला थांबले पण…”, भूक लागलेली असताना ‘श्री दत्त स्नॅक्स’ने दिलेले पोहे बघूनच भडकली मुक्ता बर्वे, म्हणाली, “पैसे गेल्याचं दुःख…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.