मराठी चित्रपट हा दिवसेंदिवस बहरत चालला आहे. विविध विषय ते विविध लोकेशन्स यामध्ये मोठा बदल झालेला सध्या दिसून येतो. महाराष्ट्र सोबतच ७ समुद्रापलीकडे देखील मराठी सिनेमा जाऊन पोहचला आहे. चित्रपट इंडस्ट्रीतील अनेक कलाकार किंवा दिगदर्शक सध्या बाहेरच्या देशात चित्रपट शूटिंग साठी जात आहेत. सोबतच रंगभूमी वरील अनेक नाटकं देखील आज जगभरात प्रयोग करताना दिसत आहेत.(Ajinkya Deo Post Viral)
मराठी चित्रपटांच्या बजेट संदर्भात अनेक प्रश्न उठवले जाताना दिसतात पण आता या प्रश्नांचं उत्तर चित्रपटांच्या निर्मितीतून दिलं जातंय असं दिसून येत. बाहेरच्या देशात कलाकारांना घेऊन जाणं तिकडे विविध लोकशन्स वर शूट करणं महागातला तामजाम किंवा चित्रपटाच्या कथेला साजेसा लागणार साहित्य वापरणं हे आता दिगदर्शकांना निर्मात्यांकडून मिळणाऱ्या आर्थिक साहाय्य मुळे आज मराठी चित्रपट उत्कृष्टपणे साधण्यासाठी सज्ज झाला आहे.
या संदर्भातील एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होताना दिसते. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अजिंक्य देवने ही पोस्ट त्याच्या फेसबुक अकाउंट वरून शेअर केली आहे. त्या मध्ये असं लिहिलं आहे कि ‘मराठी चित्रपटाच्या निर्मितीचे बजेट वाढलयं, तांत्रिकदृष्ट्या मराठी चित्रपट प्रगत झाला असून याचा सकारात्मक प्रत्यय अनेक बाबतीत दिसून येत आहे. आता मराठी चित्रपटात प्रथमच ‘ROLLS ROYCE ‘ ही उत्तम माॅडेलची गाडी दिसणार आहे. विदेशात शूटिंग करताना असेही सुखद योग येताहेत आणि मराठी चित्रपटाची निर्मिती मूल्ये उंचावत आहेत.(Ajinkya Deo Post Viral)
हे देखील वाचा – आणि निळू फुले दादांना म्हणाले ‘अशोक सराफला घ्या’
सध्या अजिंक्य देव इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे एकाच वेळेस दोन मराठी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. त्यातील एक ‘असामी अशी मी’ हा प्रेमपट असून दुसरा ‘portrait’ हा सायकॉलॉजिकल थ्रीलर आहे. दोन्हीचे दिग्दर्शन अमोल शेडगे करीत आहे. एका चित्रपटात तेजश्री प्रधान नायिका आहे, तर दुसर्यात भूषण प्रधान व श्रृती मराठे यांच्याही भूमिका आहेत’.
मराठी चित्रपटाचा हा बहारदार प्रवास प्रत्येक मराठी मनाला सुखावणारा असेल आणि येणाऱ्या काळात असेच दमदार चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळतील एवढं नक्की.