गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पारू-आदित्यची अनोखी डेट, दामिनी देवी किर्लोस्कर दोघांना शोधू शकतील का?, अहिल्यादेवींचीही काळजी वाढली

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 15, 2024 | 9:20 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Serial Update

पारू-आदित्यची अनोखी डेट, दामिनी देवी किर्लोस्कर दोघांना शोधू शकतील का?, अहिल्यादेवींचीही काळजी वाढली

‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळतं आहे की, आदित्यला आराम न करता कुठेतरी बाहेर जायचं असतं त्यामुळे तो पारूला अट सांगतो की मला तू इथून कुठेतरी बाहेर घेऊन चल. यावर पारूदेखील ती अट मान्य करते आणि सांगते की, तुम्हाला आधी हा काढा प्यावा लागेल आणि असं म्हणत त्याला बाहेर जाऊ असं सांगते. चला तयार व्हा आपण जाऊया, असं म्हणत पारू किचनमध्ये जाते तितक्यात आदित्य तयार होऊन येतो. त्याच वेळेला इकडे अहिल्यादेवी नसताना अहिल्यादेवींची जागा एका दिवसासाठी दामिनी देवी किर्लोस्कर घेते. दामिनी अहिल्यादेवी सारखाच वेष करत सगळ्यांना ऑर्डर सोडायचं ठरवते. पहिल्यांदा ती पारूच्या नावानं आरडा ओरडा करत किचनमध्ये येते त्यावेळेला आदित्य तिथे लपून बसतो. (Paaru Serial Update)

तेव्हा दामिनी सांगते की, मी आज मी तुमची मालकीण आहे हे ऐकल्यावर पारू देखील मालकीण म्हणून दामिनीचा स्वीकार करते आणि सांगते की, काय ऑर्डर आहे ती तुम्ही आम्हाला सोडा. यावर पारूला ती बाजारात जाऊन ताज्या भाज्या घेऊन ये असं सांगते. पारूदेखील हो असं सांगते आणि पिशवी घेऊन बाहेर पडते. तर आदित्य पाठीमागून बाहेर आधीच पडलेला असतो. बाहेर जाता जाता त्याला गणी दिसतो आणि गणीने पारुला पाहिलेलं असतं त्यामुळे पारू लपते. तेव्हा आदित्यला गणी विचारतो, पारू कुठे गेली तेव्हा आदित्य सांगतो, की ती घरात गेली असेल. तेव्हा आदित्य खोटं कारण सांगून त्याला दुसरीकडे पाठवून देतो बाहेर पडत असताना त्यांना प्रीतम भेटतो.

आणखी वाचा – शशांक केतकरने फिल्मसिटीबाहेरील कचऱ्याचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर BMCने घेतली दखल, स्वच्छ केला परिसर, म्हणाला, “तातडीने…”

प्रीतम त्यांना पाहून म्हणतो की तुम्ही दोघं लपून-छपून फिरायला जात आहात का?, यावर प्रीतम खूप खुश होतो कारण प्रीतम किर्लोस्कर सारखा आदित्य किलोस्करने वागावं असं प्रीतमला मनोमनी वाटत असतं. त्यामुळे तो त्यांना छत्री आणूनही देतो आणि त्यांना बाहेर जायला सांगतो. बाहेर गेल्यानंतर आदित्यला खूप वेगळं आणि खूप आनंदी वाटत असतं कारण तो असं या आधी कधीच फिरलेला नसतो. पारू त्याची काळजी घेत त्याला फिरवताना दिसते. तर इकडे अहिल्यादेवी किर्लोस्कर यांना आदित्यची काळजी वाटत असते. त्या आदित्यला सतत फोन करत असतात मात्र आदित्य त्यांचा फोन काही उचलत नाही त्यानंतर त्या श्रीकांतच्या सांगण्यावरुन प्रीतमलाही फोन करतात मात्र प्रीतम त्यांचा फोन उचलत नाही. तर इकडे आदित्य व पारू बाहेर एन्जॉय करत असतात तेव्हा आदित्य बाहेर आपण खायला नको ते चांगलं नसतं असं म्हणत नकार देतो. मात्र पारू सांगते बाहेर आल्यावर आपण बाहेरच खायला हवं असं म्हणत त्याला खायला देते. त्यानंतर इकडे अहिल्यादेवी न राहून दामिनीला फोन करतात तेव्हा दामिनी अहिल्यादेवींच्या वेशात दामिनी देवी किर्लोस्कर म्हणून वागत असते.

आणखी वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’मधील सागरची खऱ्या आयुष्यातील बायको दिसते इतकी सुंदर, अभिनय नव्हे तर ‘या’ क्षेत्रात आहे कार्यरत

अहिल्यादेवींचा फोन येतात दामिनीला खूप भीती वाटते आणि ती त्यांच्या खुर्चीवरून उठून उभी राहते आणि सांगते की, बोला वहिनी काय झालं मी दामिनी देवी किर्लोस्कर असं म्हणत बरेचदा गोंधळते. तेव्हा अहिल्यादेवी तिला शांत होण्यास सांगतात आणि सांगतात की, ताबडतोब तू आधी आदित्यच्या खोलीत जा. त्यांनतर दामिनी आदित्यच्या खोलीत जाते मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, दामिनी अहिल्यादेवी किर्लोस्कर यांना फोन करुन सांगते की पारू आदित्यला घेऊन पळून गेली आहे. आपण सर्वांना, मीडियाला काय सांगणार की, मोलकरणी बरोबर आदित्य किलोस्कर पळून गेले आहेत का?, आणि यावरच प्रोमो कट होतो. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात पुढे काय घडणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: entertainmentmarathi serialpaaru serialpaaru serial episodePaaru Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Tharal Tar Mag Serial Update

साक्षीकडून अर्जुन-चैतन्यची मोठी फसवणूक, कसा करतील दोघं याचा सामना?, या मोठ्या संकटात सायलीचाही पाठिंबा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.