शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“साईराजशी बोलतही नाही कारण…”; ‘अप्पी आमची कलेक्टर’मधील अर्जुनचं स्पष्ट मत, म्हणाला “त्याच्यापासून लांब राहतो आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 30, 2024 | 11:25 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Appi Amchi Collector fame Rohit Parashuram staying away from child actor Sairaj Kendre and explains the reason.

"साईराजशी बोलतही नाही कारण..."; 'अप्पी आमची कलेक्टर'मधील अर्जुनचं स्पष्ट मत, म्हणाला "त्याच्यापासून लांब राहतो आणि..."

झी मराठी वाहिनीवरील अनेक  मालिका सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. यापैकी एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘अप्पी आमची कलेक्टर’. ही मालिके गेलेकाही दिवस प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत असून  या मालिकेत आता एक नवा अध्याय सुरु होत आहे. मालिका आता सात वर्षांची लीप घेत आहे. त्यामुळे अप्पी व अर्जुन दोघेही सात वर्षे आपल्या जीवनात वेगवेगळ्या वाटेवर जगत असताना आता नियती परत त्यांना समोर आणणार आहे. मालिकेतील या नवीन वळणाचा प्रोमो नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे.

यामध्ये अमोल म्हणजेच अप्पीच्या मुलाची व अर्जुनची भेट होताना दिसत आहे. मालिकेतील या लीपच्या नवीन ट्विस्टमध्ये एका बालकलाकाराची एन्ट्री झालेलीही पाहायला मिळत आहे. ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ फेम साईराज केंद्रे याची अमोल म्हणून एन्ट्री झाली आहे. याचनिमित्ताने ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील अर्जुन म्हणजेच अभिनेता रोहित परशुरामने ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला. यावेळी त्याने मी साईराजबरोबर बोलत नसल्याचे म्हटले.

यावेळी त्याने असं म्हटलं की, “मालिकेतील आधीचा अर्जुन आणि आताचा अर्जुन यात खूप फरक आहे. आधीच अर्जुन हा खूप हसून खेळून राहणारा होता, याउलट आताचा अर्जुन हा खूपच कठोर आणि शिस्तप्रिय आहे. हा कठोर अर्जुन साकारताना मला खूप मेहनत घ्यावी लागली. कारण मी खऱ्या आयुष्यात इतका कठोर किंवा शिस्तप्रिय नाही. त्यामुळे ही भूमिका करण्यासाठी मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातही काही नियम स्वत:ला घालून घेतले आहेत.”

आणखी वाचा – ‘पारू’च्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराला पाहिलंत का?, अभिनेत्रीचा नवरा करतो हे काम

याबद्दल त्याने पुढे असं म्हटलं की, “आम्ही कॅमेऱ्याच्या मागे जेवताना वगैरे खूप मजामस्ती करतो किंवा समोर एखादी मजेशीर गोष्ट घडत असताना त्यावर रोहित म्हणून मला जोक करावासा वाटतो. पण अर्जुन भूमिकेसाठी मी तसं काही करत नाही. त्यामुळे विश्वास बसणार नाही पण मी या छोट्या साईराजबरोबरदेखील बोलत नाही. मी त्याच्यापासून खूप लांब राहतो. बाकी सगळी टीम त्याच्याबरोबर मजामस्ती करते. पण मी तसं काही करत नाही, कारण मला माहीत आहे त्याच्याबरोबर खेळायला सुरुवात केली तर मी पुन्हा जुना अर्जुन होईल.”

आणखी वाचा – ठरलं तर मग! सायली, अर्जुन व चैतन्य मिळून साक्षीला शिकवणार धडा, नवा डाव आखत अद्दल घडवणार अन्…

यापुढे त्याने असं म्हटलं की, “बाकी सगळी टीम त्याला चॉकलेट वगैरे आणून देते. पण मी त्याला हॅलो गुड मॉर्निंग बोलून लांब जातो. त्यामुळे मी त्याच्याबरोबर एखादा सीन वगैरे असेल तरच बोलतो नाही तर निघून जातो. हे मला करावंच लागेल. कारण प्रेक्षकांना जसा आधीचा अर्जुन आवडला तसा हा अर्जुनही आवडला पाहिजे यासाठी मला हे छोटे छोटे त्याग करावे लागत आहेत. पण तेही ठीक आहे.”

Tags: Appi Amchi Collectormarathi entertainment newsRohit Parashuramsairaj kendre
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi serial update new twist see the details

नेत्रा व इंद्राणी विरोचकाविरोधात कोणता नवा डाव आखणार?, फाल्गुनीची अवस्था पाहून तेजसचे रडून हाल, त्रिनयना देवीचा चमत्कार होणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.