छोट्या पडद्यावरील ‘पिंकीचा विजय असो’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे शरयू सोनावणे. स्टार प्रवाहवरील ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेत ‘पिंकी’ ही भूमिका साकारत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. यातील पिंकी आणि युवराज ही जोडीही चाहत्यांना विशेष आवडली.
सध्या ती झी मराठीवरील ‘पारू’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत आदित्य व तिची जोडीदेखील चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या जोडीमध्ये प्रेम बहरणार असल्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
शरयूने काही दिवसांपूर्वीच तिचा साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिनं सारखपुड्याची माहिती देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. शरयूने साखरपुड्याचे रोमँटिक फोटो शेअर करत “आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे. हॅपी अॅण्ड एंगेज” असं म्हटलं होतं.
आणखी वाचा – बॉक्स ऑफिसवर हिट झालेला ‘शैतान’ आता ओटीटीवर यायला सज्ज, कधी व कुठे पाहता येणार हा चित्रपट? जाणून घ्या…
शरयूने जयंत लाडे या व्यक्तीशी साखरपुडा केला असून तो एक दिग्दर्शक व निर्माता आहे. ‘सूर सपाटा’ आणि ‘अ पेईंग गेस्ट’ या चित्रपटांसाठी त्यानं काम केलं आहे. या चित्रपटांची त्याने निर्मिती केली आहे. शरयूदेखील ‘सुरसपाटा’ या चित्रपटात दिसली होती.
दरम्यान, शरयूने काही दिवसांपूर्वी ‘पिंकीचा विजय असो’ ही मालिका सोडली होती अन् यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला होता. त्यानंतर ती झी मराठी वरील ‘पारू’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. काही दिवसांपूर्वीच आलेली हे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेत येणारे ट्विस्ट मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सूकता वाढवत आहेत.