झी मराठी वाहिनीवरील अनेक मालिका सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. यापैकी एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘अप्पी आमची कलेक्टर’. ही मालिके गेलेकाही दिवस प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत असून या मालिकेत आता एक नवा अध्याय सुरु होत आहे. मालिका आता सात वर्षांची लीप घेत आहे. त्यामुळे अप्पी व अर्जुन दोघेही सात वर्षे आपल्या जीवनात वेगवेगळ्या वाटेवर जगत असताना आता नियती परत त्यांना समोर आणणार आहे. मालिकेतील या नवीन वळणाचा प्रोमो नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे.
यामध्ये अमोल म्हणजेच अप्पीच्या मुलाची व अर्जुनची भेट होताना दिसत आहे. मालिकेतील या लीपच्या नवीन ट्विस्टमध्ये एका बालकलाकाराची एन्ट्री झालेलीही पाहायला मिळत आहे. ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ फेम साईराज केंद्रे याची अमोल म्हणून एन्ट्री झाली आहे. याचनिमित्ताने ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील अर्जुन म्हणजेच अभिनेता रोहित परशुरामने ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला. यावेळी त्याने मी साईराजबरोबर बोलत नसल्याचे म्हटले.
यावेळी त्याने असं म्हटलं की, “मालिकेतील आधीचा अर्जुन आणि आताचा अर्जुन यात खूप फरक आहे. आधीच अर्जुन हा खूप हसून खेळून राहणारा होता, याउलट आताचा अर्जुन हा खूपच कठोर आणि शिस्तप्रिय आहे. हा कठोर अर्जुन साकारताना मला खूप मेहनत घ्यावी लागली. कारण मी खऱ्या आयुष्यात इतका कठोर किंवा शिस्तप्रिय नाही. त्यामुळे ही भूमिका करण्यासाठी मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातही काही नियम स्वत:ला घालून घेतले आहेत.”
आणखी वाचा – ‘पारू’च्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराला पाहिलंत का?, अभिनेत्रीचा नवरा करतो हे काम
याबद्दल त्याने पुढे असं म्हटलं की, “आम्ही कॅमेऱ्याच्या मागे जेवताना वगैरे खूप मजामस्ती करतो किंवा समोर एखादी मजेशीर गोष्ट घडत असताना त्यावर रोहित म्हणून मला जोक करावासा वाटतो. पण अर्जुन भूमिकेसाठी मी तसं काही करत नाही. त्यामुळे विश्वास बसणार नाही पण मी या छोट्या साईराजबरोबरदेखील बोलत नाही. मी त्याच्यापासून खूप लांब राहतो. बाकी सगळी टीम त्याच्याबरोबर मजामस्ती करते. पण मी तसं काही करत नाही, कारण मला माहीत आहे त्याच्याबरोबर खेळायला सुरुवात केली तर मी पुन्हा जुना अर्जुन होईल.”
आणखी वाचा – ठरलं तर मग! सायली, अर्जुन व चैतन्य मिळून साक्षीला शिकवणार धडा, नवा डाव आखत अद्दल घडवणार अन्…
यापुढे त्याने असं म्हटलं की, “बाकी सगळी टीम त्याला चॉकलेट वगैरे आणून देते. पण मी त्याला हॅलो गुड मॉर्निंग बोलून लांब जातो. त्यामुळे मी त्याच्याबरोबर एखादा सीन वगैरे असेल तरच बोलतो नाही तर निघून जातो. हे मला करावंच लागेल. कारण प्रेक्षकांना जसा आधीचा अर्जुन आवडला तसा हा अर्जुनही आवडला पाहिजे यासाठी मला हे छोटे छोटे त्याग करावे लागत आहेत. पण तेही ठीक आहे.”