‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेने नुकतेच एक उत्कंठावर्धक वळण घेतले आहे. विरोचकाने रुपालीला एक अदृश्य शक्ती दिल्यामुळे रुपाली त्या शक्तीचा कुटुंबियांविरुद्ध वापर करत आहे. रुपाली तिच्या संमोहित करण्याच्या शक्तीचा वापर केतकी व फाल्गुनी यांना वश करते. तसेच रुपालीने त्या दोघींनी कुणी त्रास दिला तर त्या स्वत:च एकमेकींचा जीव घेतील. यांची राजाध्यक्ष कुटुंबीयांना चिंता लागून राहिली आहे.
विरोचकाच्या या शक्तीची आता साऱ्यांनाच भीती वाटत आहे, त्यामुळे तिच्याविरुद्ध कसे लढावे हा प्रश्न राजाध्यक्ष कुटुंबीयांना पडला आहे. अशातच मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये तेजस विरोचकाच्या या शक्तील खूपच घाबरलेला दिसत आहे. यामध्ये तो नेत्रा-अद्वैतला विरोचकाच्या शक्तीला रोखण्याचे आवाहन करत आहे. या व्हिडीओमध्ये तो नेत्राला असं म्हणतो की, “फाल्गुनी व केतकी काकू विरोचकाच्या नियंत्रणाखाली आहेत. तर नेत्रा तू त्यांना विरोचकापासून वाचवशील ना? आणि मला माहीत आहे, तू त्यांना यातून बाहेर काढशील.”
यापुढे तो असं म्हणतो की, “फाल्गुनी व केतकी काकू विरोचकाच्या नियंत्रणाबाहेर येणे गरजेचे आहे. त्यामुळे नेत्रा तू काहीही करुन त्यांना यातून बाहेर काढ. तू सांगशील ते मी करेन. तू जसं म्हणशील तसं मी वागेन. पण कृपया त्यांना विरोचकाच्या शक्तीपासून वाचव.” त्यामुळे मालिकेतील हा नवीन ट्विस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
आणखी वाचा – ‘पारू’च्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराला पाहिलंत का?, अभिनेत्रीचा नवरा करतो हे काम
मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट्स या मालिकेची प्रेक्षकांमध्ये उत्कंठा अधिकच वाढवत आहेत. त्यामुळे मालिकेत येणारा प्रत्येक नवीन ट्विस्ट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. त्यामुळे आता नेत्रा फाल्गुनी व केतकी काकूल विरोचकाच्या तावडीतून कसं सोडवणार? विरोचक त्याच्या शक्तीचा आणखी कुणाविरुद्ध वापर करणार? तसेच विरोचक आणखी कुणाला संमोहित करणार का? याचीदेखील प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.