Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील एक नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये स्पर्धकांवर जरब बसवायला घरात मानकाप्याची एण्ट्री होणार असल्याचं दिसलं. स्पर्धकांना भीती घालायला स्पर्धकांवर वर्चस्व गाजवायला ‘बिग बॉस’च्या घरात मानकाप्याची एण्ट्री झाल्याने स्पर्धकांना सावधान राहण्याचा इशारा ‘बिग बॉस’ यांनी दिलेला पाहायला मिळतोय. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘बिग बॉस’कडून घोषणा केलेला हा नवा टास्क नेमका काय आहे याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
मानकाप्या येणार याची घोषणा होताच घरातील सर्व दिवे बंद होतात. सगळे स्पर्धक गोंधळून जातात आणि आश्चर्यचकित होत एकमेकांच्या जवळ जातात. घरात जोरजोरात आवाज येतो तेव्हा सगळे स्पर्धक इकडे तिकडे धावू लागतात. त्यानंतर सर्व स्पर्धकांना बाहेर बोलावलं जातं तेव्हा समोरच्या असलेल्या काचेवर “एकटं फिरू नका…नाहीतर..मानकाप्या”, असे लाल अक्षरात लिहून आलेलं असतं.प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत, “सावधान… या घरावर आलंय एक मोठं संकट… तो आलाय.. मानकाप्या…”. प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्यांची झोप उडालेली असून ते चांगलेच घाबरलेले दिसत आहेत.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सावधान! Bigg Boss च्या घरातील स्पर्धकांची झोप उडणार, मानकाप्याची एण्ट्रीने आलं मोठं संकट
‘बिग बॉस मराठी’चा हा नवीन प्रोमो पाहून नेटकरी मात्र काहीसे भडकले आहेत. कारण या प्रोमोमध्ये जेल मध्ये बंद असलेली जान्हवी किल्लेकर घरात वावरताना दिसली. पॅडी दादांच्या करिअरवरुन अपमान केल्याने जान्हवीची भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने चांगलीच शाळा घेतली. संपूर्ण आठवडाभर जेलमध्ये राहायचं, बाहेर यायचं नाही. तिथेच राहायचं, झोपायचं, जेवायचं असं रितेशने जान्हवीला सांगितलं होतं. अशातच नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी घरात स्पर्धकांसह वावरताना दिसत आहे.
जान्हवीला घराबाहेर आलेलं पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत अनेक कमेंट केलेल्या दिसल्या. दरम्यान, “बिग बॉस हा फेक गेम आहे जान्हवी कशी बाहेर आली”, “जान्हवी बाहेर का आली… हिला ठेवा जेल मध्येच”, “जान्हवी जेलमधून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाहेर आली” अशा अनेक कमेंट करत सवाल केला आहे. शिक्षा सुनावलेली असताना जान्हवी जेलबाहेर येऊन स्पर्धकांमध्ये नक्की काय करत होती या प्रश्नाने साऱ्यांना भंडावून सोडलं आहे.