बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री नीना गुप्ता सध्या अधिक चर्चेत आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.सोशल मीडियावरदेखील त्या मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेल्या पाहायला मिळतात. त्यांचे अनेक बोल्ड लूकमधील फोटो व्हायरलदेखील होतात. वयाच्या ६५ व्या वर्षीदेखील त्यांचा फिटनेस पाहायला मिळतो. पण आता लवकरच त्या आजी होणार आहेत. नीना यांची मुलगी गरोदर असून लवकरच गोंडस बाळाला जन्म देणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. आता मसाबाचे डोहाळेजेवण पार पडले असून फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. (masaba gupta baby shower)
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मसाबाने बेबी बम्प फ्लॉंट करतानाचे फोटो शेअर केले होते. यावरुन नीना आजी होणार असल्याचे जाहीर झाले होते. आता पुन्हा एकदा डोहाळेजेवणाचे फोटो समोर आले आहेत. यामध्ये मनोरंजन सृष्टीतील इतर दिग्गजदेखील उपस्थित असलेले दिसून आले. यावेळी सोनम कपूर तिची बहीण रियाबरोबर पोहोचली होती. तसेच आलिया भट्टची आई सोनी राजदानदेखील तिथे उपस्थित असलेली दिसून आली.
सोनी यांनी सोशल मीडियावर डोहाळेजवणाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “जेव्हा तुम्ही जगातील सर्वात प्रेमळ लोकांबरोबर असता तेव्हा त्यावेळी विचार करावा लागत नाही. मसाबा व सत्यदीप आई-बाबा होणार आहेत. त्यांना पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
याशिवाय सोनमनेदेखील इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये कपूर बहिणी मसाबावर प्रेम करताना दिसत आहेत. मसाबाने पिच रंगाचा वेस्टर्न ड्रेस परिधान केला असून तिचा ग्लो दिसून येत आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच सहभागी असलेल्या कलाकारांचे कौतुकदेखील केले आहे. मसाबाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती बॉलिवूडमधील लोकप्रिय फॅशन डिझायनर आहे. तसेच तिचा मेकअप व स्कीनकेअर उत्पादनाचीदेखील मालकीण आहे. दरम्यान आता नीना नातवाच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत आहेत.