काही मालिका वेगळ्या कथानक, कलाकारांचा अभिनय यांमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करीत असतात. काही मालिका या सतत चर्चेत असतात. अशाच काही मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका आहे. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने तब्बल आठ वर्षांचा लीप घेतला होता. लीपपूर्वी सरकारनेच अर्जुनच्या आईचा खून केल्याचे सत्य सर्वांसमोर आलेले. विशेष म्हणजे हे सत्य अप्पीला माहिती असून सुद्धा तिने आपल्यापासून ते लपवलं यामुळे अर्जुनने तिच्यापासून दुरावा निर्माण केलेला. म्हणूनच ते दोघं वेगळे राहू लागलेले. (Appi Aamchi Collector Serial Update)
अखेर आठ वर्षानंतर अप्पी तिचा मुलगा अमोलला घेऊन पुन्हा एकदा पुण्यात राहायला येते आणि मग अर्जुनची त्यांच्याशी भेट होते. अमोलमुळे अप्पी व अर्जुन एकमेकांबरोबर राहू लागतात, पण तरीही त्यांना एकमेकांच्या काही गोष्टी पटत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात सतत खटके उडत असतात. पण अमोल त्यांना सतत एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतो. नुकताच मालिकेत अमोलला आजार झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे त्याच्याकडे फक्त काहीच दिवस शिल्लक असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र तरीही अमोलने आपल्या आई-बाबांना एकत्र आणले. अशातच आता मालिकेच्या नवीन ट्विस्टबद्दल आणखी एक प्रोमो समोर आला आहे.
आणखी वाचा – चारुलता व चारुहासच्या लग्नासाठी अक्षराची धडपड, मात्र अधिपतीची नाराजी, दोघांमध्ये सुरु झाले वाद
या नवीन प्रोमोमध्ये सिंबाच्या (अमोल) शाळेत उत्तम पालकांची स्पर्धा होणार आहे, ज्यात मुलांच्या आवडी-निवडी जपणाऱ्या पालकांना ट्रॉफी मिळणार आहे. यावेळी सिंबाच्या शिक्षिका त्यांना काही प्रश्न विचारणार आहेत. यापैकी शिक्षिका त्यांना अमोलचा आवडता रंग विचारतात. तेव्हा अप्पी निळा असं उत्तर देते. त्यानंतर त्यांना अमोलचा आवडता खेळ विचारला जातो. तेव्हा अर्जुन क्रिकेट असं उत्तर देतो. पुढे अमोलचे सर्वात जास्त प्रेम कुणावर आहे असं विचारताच अप्पी असं म्हणते की, “त्याचं सगळ्यात जास्त प्रेम त्याच्या आई-बाबांवर आहे”.
आणखी वाचा – ना डिझाइनर कपडे, ना अवाढव्य खर्च; इतक्या साधेपणात केलं पृथ्वीक प्रतापने लग्न, साऊथ इंडियन स्टाइल लूकची चर्चा
या स्पर्धेत अप्पी व अर्जुन जिंकतील का? हे पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. दरम्यान, ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत नुकत्याच आलेल्या या नवीन ट्विस्टची गेले काही दिवस प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. अप्पी व अर्जुन यांनी एकत्र यावे असे अनेक चाहते मंडळी म्हणत होते. अखेर चाहत्यांनी ही इच्छा पूर्ण होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.