शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अप्पी-अर्जुनने पुन्हा लग्न करण्यास अमोलला दिला नकार, निर्णय ऐकताच चक्कर, रुग्णालयात भरती होताच निर्णय बदलणार का?

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 3, 2024 | 4:22 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Aamchi Collector serial update new promo Amol will get sick as Appi and Arjun refuse to marry

अप्पी-अर्जुन यांनी लग्न करण्यास नकार दिल्याने अमोल पडला आजारी, लेकासाठी दोघे पुन्हा लग्न करणार का?

‘अप्पी आमची कलेक्टर’ ही झी मराठीवरील मालिका सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. अमोलच्या आजारपणामुळे ही मालिका सध्या नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. अमोलने त्याची शेवटची इच्छा बोलून दाखवली आहे. अमोलच्या आजारामुळे सर्वजण त्याला आनंदी ठेवण्यासाठी अमोलच्या सगळ्या इच्छा आणि हट्ट सगळे पूर्ण करत आहेत. अशात त्याने त्याची नवी इच्छा बोलून दाखवली आहे. त्यामुळे ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही आता नव्या टप्प्यावर आहे. अमोल त्याची शेवटची इच्छा बोलून दाखवणार आहे. जी ऐकून अप्पी-अर्जुन थक्क होतात. अमोल सर्वांसमोर आपली खरी इच्छा, अप्पी आणि अर्जुनच लग्न असल्याचं सांगतो. (appi amchi collector serial update)

मालिकेच्या याच ट्विस्टचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये अमोल अप्पी व अर्जुन यांना असं म्हणतो की, “मला मा आणि तुझं लग्न झालेलं पाहायचं आहे”. त्यावर अर्जुन अमोलला स्पष्ट नकार देतो. अर्जुन अमोलला “अमोल बाळा हे नाही होणार, तुला दूसरं काही मागायचं असेल तर माग” असं म्हणतो. त्यानंतर अमोल नाराज होतो आणि तिथून जात असताना त्याला अचानक चक्कर येते आणि तो खाली कोसळतो. त्यानंतर अर्जुन व अप्पी त्याला दवाखान्यात घेऊन जातात.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – ‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्री श्रद्धा आर्याने दिला जुळ्या मुलांना जन्म, रुग्णालयातच केली सजावट, दाखवली संपूर्ण झलक

अमोलच्या अप्पी व अर्जुनच्या लग्नाच्या या मागणीला बापू आणि विनायक अमोलच्या बाजूने उभे आहेत. अमोलला डॉक्टर त्याची तपासणी करून अमोलकडे फारसा वेळ उरला नसल्याचं सांगतात. आता फक्त एक शस्त्रक्रिया त्याला ०५ टक्के जगण्याची संधी देऊ शकते. हे ऐकून अप्पी आणि अर्जुन लग्न करण्यास तयार होतात. आता ही गोष्ट संकल्पच्या कानावर पडणार आहे.

आणखी वाचा – Video : २४ वर्षीय सुप्रसिद्ध अभिनेत्री समुद्रकिनीरी करत होती योगा, मोठी लाट आली अन् जागीच मृत्यू, कॅमेऱ्यामध्ये घटना कैद

अमोलच्या आग्रहनुसार हा विवाह सर्व पारंपरिक विधींसह दणक्यात पार पडणार. पण अमोलची एक अट आहे, की लग्न शस्त्रक्रियेनंतर नाही तर त्याआधीच व्हायला हवं. त्यामुळे आता अमोलसाठी अप्पी व अर्जुन लग्न करायला तयार होणार का? त्यांच्या लग्नामुळे अमोलच्या तब्येतीत सुधारणा होणार का? की अर्जुन व अप्पी यांच्या आयुष्यात पुन्हा काय नवीन वादळ येणार? हे मालिकेच्या आगामी भागातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Tags: Appi Amchi Collectorappi amchi collector marathi tv serialAppi Amchi Collector Serial Update
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
navri mile hitlerla serial update serial update new promo Leela revealed to ej that pramod and viraj cheated in their own office

प्रमोद-विराजचा स्वत:च्याच ऑफिसमध्ये मोठा फ्रॉड, लीलाने समोर आणलं सत्य, आता एजे काय शिक्षा करणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.