सोशल मीडियावर एका रशियन अभिनेत्रीचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर कोणाच्याही हृदयाला धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये रशियन अभिनेत्री समुद्रकिनारी आरामात बसून योगा करत होती आणि अचानक ती पाण्यात वाहून गेली. हा व्हिडीओ सध्या जगभरात व्हायरल होत आहे. थायलंडच्या प्रवासादरम्यान कोह सामुईच्या खडकावर योगा करत असताना कमिला बेल्यातस्काया नावाच्या अभिनेत्रीला लाटेचा धक्का बसला आणि यात तिचा मृत्यू झाला. ती २४ वर्षांची होती. अभिनेत्रीच्या एका व्हिडीओमध्ये ती पडताना आणि घसरताना दाखवण्यात आली आहे. (kamilla belyatskaya death)
सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्री समुद्राच्या मध्यभागी खडकावर बसून योगा करताना दिसत आहे. या अपघातापूर्वीही कमिलाने या ठिकाणाचं सौंदर्य दाखवणारी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने सांगितले होते की तिला कोह सामुई प्रचंड आवडतं… पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली होती, “मला समुई प्रचंड आवडतं. हे खडक मी माझ्या आयुष्यात पाहिलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील सर्वोत्तम गोष्ट आहे”. अभिनेत्रीच्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिय देत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या दुर्दैवी अपघाताची चर्चा रंगली आहे.
Hình ảnh cuối của nữ du khách tập yoga trên mỏm đá trước khi bị sóng cuốn
— South of Vietnam (@vincent31473580) December 1, 2024
Một nữ du khách Nga 24 tuổi đã bị sóng cuốn xuống biển khi tập yoga trên mỏm đá tại điểm ngắm cảnh Lad Koh, đảo Koh Samui, Thái Lan vào ngày 29-11. pic.twitter.com/7VYbwevCzM
मिळालेल्या माहितीनुसार कमिला बॉयफ्रेंडबरोबर सुट्ट्यांचा आनंद घेत होती. अभिनेत्री कायम थायलंडमधील कोह सामुई येथे येत असे. कारण अभिनेत्रीला हे स्थळ प्रचंड आवडलं होतं. ‘पृथ्वीवरील सर्वात चांगली जागा…’ असं देखील अभिनेत्री या जागेला म्हणायची. या घटनेनंतर, स्थानिक अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि खडकाळ भागात प्रवेश प्रतिबंधित केला आहे. अशी माहिती स्थानिक माध्यमांकडून मिळत आहे. सामुईरेस्क्यू सेंटरचे प्रमुख चैपोर्न सबप्रासेट म्हणाले, ‘पावसाळ्याच्या काळात, आम्ही पर्यटकांना सतत चेतावणी देतो’.
दरम्यान, कमिला बेल्यात्स्काया अभिनेत्री नोवोसिबिर्स्क, रशियाची होती. ती तिच्या प्रियकरासोबत थायलंडला गेली होती. खडकावर चटई ठेऊन ती योगा करत असताना हा भीषण अपघात झाला. तात्काळ आपत्कालीन पथके घटनास्थळी पोहोचली. मात्र त्याला वाचवण्यात यश आले नाही. त्याचा मृतदेह नंतर घटना घडल्यापासून दोन तृतीयांश मैल अंतरावर सापडला.