झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेत काय घडतं? काय बिघडतं? याकडे प्रेक्षकांचं लक्ष असतं. आता या मालिकेत अनपेक्षित वळण आलं आहे. लीलाच्या घर चालवण्याचा अंदाज पाहून एजे प्रभावित होणार आहे. लीलाच्या हातात जहागीरदारांच्या घराच्या किल्ल्या देण्यात आल्या आहेत. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत लीला आणि रेवतीचा झालेल्या अपघाताने खूप गोष्टींचा उलगडा झाला आहे. लीला ठरवते की यश सापडल्याशिवाय ती घरात परत येणार नाही. एजे आणि लीला एकत्र येऊन यशचा शोध घेतायत, पण आता दुर्गा त्याला विरोध करते. (navri mile hitlerla serial update)
एजे आणि सरोजिनी सोडून सगळेजण दुर्गाच्या बाजूने आहेत. शेवटी, लीला घर सोडून जाते आणि पुन्हा एजे आणि लीलामध्ये दुरावा निर्माण होतो. मात्र, विश्वरूपच्या मदतीने ते दोघं पुन्हा एकत्र येतात. याच दरम्यान किशोर आणि विक्रांत एका योजनेवर काम करतायत ज्यावर त्यांचे मतभेद होतात. एजे लीलाला त्याच्या रेस्टॉरंट पुन्हा जॉईन करण्याचा सल्ला देतो. लीलाला रेस्टॉरंटमधील घोटाळ्याचा संशय आला आहे. मालिकेचे हे कथानक अगदीच अनपेक्षित आहे आणि याच ट्विस्टचा प्रोमो समोर आला आहे.
या प्रोमोमध्ये लीला एका गाडीचा पाठलाग करत त्यांना पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे आणि तिला पाठलाग करताना बघून गाडीच्या चालकालाही संशय येतो. यावर तो ही बाई आपला पाठलाग करत आहे का? असं विचारतो. यावर बाजूला बसलेला माणूस त्या आपल्या लीला मॅडम आहेत, म्हणजेच एजे सरांच्या मिसेस असं म्हणतो. यानंतर गाडीच्या समोर जात लीला गाडी थांबवते आणि गाडीची चौकशी करते. चौकशी केल्यानंतर तिला लक्षात येते की, यात एजेंच्या ऑफिसमधील काही गोष्टी आहेत. यानंतर ती ऑफिसमध्ये जात या संपूर्ण प्रकरणी चौकशी करते.
तेव्हा तिच्या लक्षात येते की, प्रमोद आणि विराज हे त्या घोटाळ्याचे मुख्य चेहरे आहेत. यावर एजेदेखील त्यांच्यावर भडकतात. “स्वत:च्या ऑफीसमध्ये एवढा मोठा फ्रॉड करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही” असं म्हणत ते रागावतात. तसंच यावर मला आता काही तरी अॅक्शन घ्यावीच लागणार आहे असंही ते म्हणतात. त्यामुळे आता एजे ऊयाय दोघांवर नक्की काय अॅक्शन घेणार? यामुळे लीला-एजेंच्या नात्यावर काय परिणाम होणार? हे मालिकेच्या आगामी भागातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.