‘अप्पी आमची कलेक्टर’ ही झी मराठीवरील मालिका सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. अमोलच्या आजारपणामुळे ही मालिका सध्या नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. अमोलने त्याची शेवटची इच्छा बोलून दाखवली आहे. अमोलच्या आजारामुळे सर्वजण त्याला आनंदी ठेवण्यासाठी अमोलच्या सगळ्या इच्छा आणि हट्ट सगळे पूर्ण करत आहेत. अशात त्याने त्याची नवी इच्छा बोलून दाखवली आहे. त्यामुळे ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही आता नव्या टप्प्यावर आहे. अमोल त्याची शेवटची इच्छा बोलून दाखवणार आहे. जी ऐकून अप्पी-अर्जुन थक्क होतात. अमोल सर्वांसमोर आपली खरी इच्छा, अप्पी आणि अर्जुनच लग्न असल्याचं सांगतो. (appi amchi collector serial update)
मालिकेच्या याच ट्विस्टचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये अमोल अप्पी व अर्जुन यांना असं म्हणतो की, “मला मा आणि तुझं लग्न झालेलं पाहायचं आहे”. त्यावर अर्जुन अमोलला स्पष्ट नकार देतो. अर्जुन अमोलला “अमोल बाळा हे नाही होणार, तुला दूसरं काही मागायचं असेल तर माग” असं म्हणतो. त्यानंतर अमोल नाराज होतो आणि तिथून जात असताना त्याला अचानक चक्कर येते आणि तो खाली कोसळतो. त्यानंतर अर्जुन व अप्पी त्याला दवाखान्यात घेऊन जातात.
अमोलच्या अप्पी व अर्जुनच्या लग्नाच्या या मागणीला बापू आणि विनायक अमोलच्या बाजूने उभे आहेत. अमोलला डॉक्टर त्याची तपासणी करून अमोलकडे फारसा वेळ उरला नसल्याचं सांगतात. आता फक्त एक शस्त्रक्रिया त्याला ०५ टक्के जगण्याची संधी देऊ शकते. हे ऐकून अप्पी आणि अर्जुन लग्न करण्यास तयार होतात. आता ही गोष्ट संकल्पच्या कानावर पडणार आहे.
अमोलच्या आग्रहनुसार हा विवाह सर्व पारंपरिक विधींसह दणक्यात पार पडणार. पण अमोलची एक अट आहे, की लग्न शस्त्रक्रियेनंतर नाही तर त्याआधीच व्हायला हवं. त्यामुळे आता अमोलसाठी अप्पी व अर्जुन लग्न करायला तयार होणार का? त्यांच्या लग्नामुळे अमोलच्या तब्येतीत सुधारणा होणार का? की अर्जुन व अप्पी यांच्या आयुष्यात पुन्हा काय नवीन वादळ येणार? हे मालिकेच्या आगामी भागातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.