शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘अप्पी आमची…’मधील अप्पीच्या चेहऱ्यावर मुरुम, मालिकेच्या प्रोमोमध्येच दिसताच प्रेक्षक म्हणाले, “थोडी काळजी घे…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 19, 2024 | 8:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
appi amchi collector serial

अप्पी आमची कलेक्टर मालिकेमधील अप्पीच्या चेहऱ्यावरील पिंपल्सवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत

Appi Aamchi Collector : छोट्या पडद्यावरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. गेली काही वर्षे ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अप्पी, अर्जुन व सिंबा यांच्यासह प्रत्येक पात्र चाहत्यांच्या मनात घर करून गेलं आहे. त्यामुळे हे प्रत्येक पात्र दर्शकांना आपलसं वाटतं. मालिकेतील अप्पी या पात्राला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तिची भूमिका व तिचा अभिनय प्रेक्षकांना आवडत असून तिच्या अभिनयाचे कौतूक होत असतं. मात्र नुकतंच तिला बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागत आहे. (Appi Aamchi Collector)

झी मराठीच्या इन्स्टग्राम अकाऊंटद्वारे एक ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे आणि या व्हिडीओमध्ये तिच्या चेहऱ्यावर तारुण्यपिटिका (Pimples) आहेत. यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. सोशल मीडियावर कलाकारांना चाहत्यांकडून जितकं प्रेम मिळत, तितकचं त्यांना ट्रोलदेखील केलं जातं. असंच काहीसं अप्पीबरोबर होत आहे. झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी कमेंट्स करत अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – साताजन्माची साथ अपूर्णच! अतुल परचुरेंच्या आजारपणात पत्नी सोनिया यांनी दिला होती खंबीर साथ, स्वत:च सांगितलेली संपूर्ण परिस्थिती

या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी “शूटिंगमुळे चेहरा खराब होत आहे अपर्णा”, “खूप पिंपल्स आलेत काळजी घ्या”, “चेहऱ्यावर किती पिंपल्स आलेत”. अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. तसंच काहींनी तिला पिंपल्स येऊ नयेत याबद्दल सूचनाही दिल्या आहेत. व काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, मालिकेत सिंबाला कोणता तरी गंभीर आजार झाला असून  याबद्दल त्याला स्वत:लाच माहिती पडल्यामुळे तो आता यातून कसा बाहेर येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आणखी वाचा – स्पृहा जोशीचे आई-बाबा दोघंही रुग्णालयात दाखल, उपचारादरम्यानचा फोटो समोर, म्हणाली, “दोघांचीही तब्येत सुधारत आहे आणि…”


मालिकेत याआधी अमोल देवासमोर हात जोडून प्रार्थना करत “मला काही झालं तरी चालेल. पण माझ्या माँ आणि बाबांना एकत्र आण” असं म्हटला होता. मालिकेत दाखविल्याप्रमाणे, अर्जुन अप्पीला म्हणतो की आपण फक्त अमोलसाठी एकत्र राहायचं. इथून पुढे आपल्यात नवरा-बायकोचं नातं नसेल. ही गोष्ट अमोलला चुकूनही कळाली नाही पाहिजे. मात्र ही गोष्ट अमोल ऐकतो आणि तो बेशुद्ध पडतो.

Tags: appi aamchi collectorMarathi Serial Newsmarathi serials
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
devoleena bhattacharjee matrnity photoshoot

'गोपी बहु' देवोलिना भट्टाचार्जीचं प्रेग्नसीमध्ये नवऱ्यासह रोमँटिक फोटोशूट, फ्लॉन्ट केलं बेबी बंप, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.