Parineeti Chopra and Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. ऑक्टोबर २०२५ मध्ये ते त्यांचा मुलगा नीरचे आई-वडील झाले. नेहमीच दोघे, त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट आणि सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकण्याच्या प्रयत्नांनी लोकांची मने जिंकत असतात. नवीन पोस्टमध्ये, परिणीतीने संसदेत प्रसूती रजेचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल राघव चढ्ढा यांचे कौतुक केले. काळजी घेणे हे संयुक्त कर्तव्य असल्याचे सांगून आणि ते भारतात कायदेशीर बनवण्याचे आवाहन करत, राघव चढ्ढा यांनी आपल्या शब्दांनी सर्वांची मने जिंकली. ते म्हणाले, “पित्याने आपल्या नवजात मुलाची काळजी घेणे आणि त्याची नोकरी यापैकी एक निवडण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे, आईने आपल्या पतीच्या पाठिंब्याशिवाय प्रसूती आणि त्याचे परिणाम सहन करु नये”.
इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट करत परिणिती चोप्राने पती राघवचे कौतुक करताना अभिमान वाटला असल्याचं म्हटलं आणि लिहिलं, “माझे प्रिय पती, तुम्हाला आज खासदार म्हणून नव्हे तर आमच्या मुलाचे नवीन वडील म्हणून बोलताना पाहणे हा एक क्षण आहे जो मी दीर्घकाळ जपत राहीन. आज तू बाप म्हणून बोललास मी रोज पाहते”. परिणीतीने सांगितले की या दोघांमध्ये किती वेळा चर्चा झाली, त्यांच्या मुलावर दोन्ही पालकांचे पूर्ण अधिकार आहेत.
आणखी वाचा – “लहान वयात लग्न, वर्षातच घटस्फोट आणि…” सुप्रसिद्ध बॉलिवूड गायिकेचा धक्कादायक खुलासा
परिणीती पुढे लिहिते, “जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा फक्त आईच नाही तर वडीलही जन्माला येतात. ही जबाबदारी एकट्याने पार पाडणाऱ्या अनेक माता आहेत, अनेकदा न ऐकलेल्या आणि न पाहिलेल्या. अशी घरे जिथे वडील आणि कुटुंबाचा आधार नाही. आज तुम्ही त्यांचा एकटेपणा संसदेत आणला आहे. एक अशी जागा जिथे ती खरोखरच महत्त्वाची आहे. जर हे काही पालकांना, विशेषत: मातांना अधिक आधार वाटत असेल, तर ते आमच्यासाठी एक विजय असेल. एक आदर्श पिता आणि एक आदर्श नेता असल्याबद्दल धन्यवाद. मी रोज पाहत आहेच, आता भारतालाही दिसेल. मला तुझा सदैव अभिमान वाटतो माझ्या शुभेचछा. परिणीती चोप्रा, अभिनेत्री”.
आणखी वाचा – माईक हिसकावला, पुष्पगुछ देऊन परत घेतला आणि…; सुनील पाल यांचा भर सन्मान सोहळ्यात अपमान, व्हिडीओ व्हायरल
राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा विवाह सप्टेंबर २०२३ मध्ये उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये झाला. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. दरम्यान, वर्क फ्रंटवर, परिणीती चोप्रा शेवटची इम्तियाज अलीच्या २०२४ म्युझिकल बायोपिक ‘अमर सिंग चमकीला’ मध्ये दिलजीत दोसांझच्या विरुद्ध दिसली होती.





