छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली सीआयडी (CID) ही मालिका आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. या मालिकेने तब्बल २० वर्ष प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन केलं. एसीपी प्रद्युम्न, दया आणि अभिजीत ही टीम प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली. आता पुन्हा एकदा ही टीम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. इतकच नव्हे तर मराठीत ही टीम सत्याचा शोध घेण्यासाठी येणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर सीआयडी (CID) ही मालिका पुन्हा एकदा सुरु होणार आहे. अभिजीत, दया आणि एसीपी प्रद्युम्न हे पुन्हा एकदा सत्याचा शोध घेण्यासाठी येणार आहेत. (Marathi CID Serial)
९० च्या दशकातील ही गाजलेली मालिका आता पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्जा झाली आहे. काही दिवसांपूर्वी सोनी मराठी वाहिनीवर मराठी सीआयडी (CID) मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून ही मालिका कधी सुरु होणार याची उत्सुकता लागून राहिली होती आणि ही उत्सुकता आता संपली आहे. कारण या मालिकेची नुकतीच तारीख व वेळ जाहीर करण्यात आली आहे.
येत्या ८ नोव्हेंबर पासून शुक्रवार ते रविवार् रात्री ८.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोनी मराठी वाहिनीकडून या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करत तारीख व वेळ जाहीर करण्यात आली आहे. सोनी मराठीने शेअर केलेल्या या नवीन प्रोमो खाली “गुन्ह्यांचा छडा लावून गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी येत आहे टीम सी.आय.डी. आता मराठीत!” असं म्हटलं आहे.
आणखी वाचा – Appi Aamchi Collector : अमोलमुळे अप्पी-अर्जुनमध्ये जवळीक, पुन्हा बहरणार प्रेम, कायमचं एकत्र येणार का?
दरम्यान, सीआयडी (CID) सोनी टीव्हीवरील सर्वात यशस्वी मालिका आहे. मालिकेने यशस्वीपणे २० वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहेत. २० वर्षांपासून सुरू असलेल्या या मालिकेचा आजही मोठा चाहता वर्ग आहेत. सीआयडी (CID) हा शो विविध विक्रमांसाठीही ओळखला जातो. ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्येही या शोची नोंद आहे. अशातच आता हा शो मराठीमध्ये येत असल्यामुळे अनेक चाहते उत्सुक आहेत.