रविवार, सप्टेंबर 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने घेतली नवी गाडी, फोटो शेअर करत म्हणाला, “पहिली कार…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 2, 2026 | 10:51 am
in Entertainment, Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Famous Actor Buys New Car Video

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने घेतली नवी गाडी

Famous Actor Buys New Car Video : मराठी मनोरंजन विश्वात आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या कलाकारांच्या यशकथा नेहमीच प्रेरणादायी ठरतात. अशीच एक आनंदाची बातमी सध्या समोर आली आहे. निशांत पवार या लोकप्रिय अभिनेत्याने नुकतीच स्वतःच्या कमाईतून त्याची पहिली कार खरेदी केली आहे. ‘इंद्रायणी’ या मालिकेत ‘अधोक्षज’ ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा निशांत पवार हा केवळ अभिनयापुरताच मर्यादित नाही, तर सोशल मीडियावरही तो मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. तो सतत आपल्या चाहत्यांसोबत वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील खास क्षण शेअर करत असतो.

अशातच निशांतने त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. त्याने नुकतीच Tata Nexon ही कार खरेदी केली असून, या नव्या गाडीबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. “स्वप्न ते वास्तव… माझी पहिली कार” अशा शब्दांत त्याने या क्षणाचं वर्णन केलं आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये निशांत आपल्या कुटुंबासोबत कार घ्यायला गेल्याचं दिसतं. विशेष म्हणजे, त्याच्या आईने पारंपरिक पद्धतीने गाडीची पूजा केल्याचाही सुंदर क्षण यात पाहायला मिळतो. या प्रसंगी निशांतने आपल्या भावना व्यक्त करत सांगितलं की, “पप्पा नेहमी म्हणायचे, स्वतः कमव आणि स्वतः घे. आज स्वामींच्या आशीर्वादाने आणि आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे हे स्वप्न पूर्ण झालं.”

आणखी वाचा – १० वर्षांनंतर मालिकेत कमबॅक केलं, मराठमोळ्या अभिनेत्रीची मालिका तीन महिन्यातच बंद?

View this post on Instagram

A post shared by ✨ Nishant Madhuri Kishor Pawar ✨ (@nishantpawar_77)

निशांतच्या या यशावर त्याच्या चाहत्यांनी आणि मनोरंजन क्षेत्रातील सहकलाकारांनी भरभरून प्रेम व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर “अभिनंदन!”, “तुझा अभिमान वाटतो”, “अशीच प्रगती करत राहा” अशा अनेक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. स्वतःच्या कष्टाने मिळवलेला हा आनंद निशांतसाठीच नाही, तर त्याच्या चाहत्यांसाठीही अभिमानाचा क्षण ठरला आहे.

आणखी वाचा – डोक्यावर ओढणी, भांडी घासली आणि…; सुवर्ण मंदिरातील प्रियांका चोप्राच्या ‘त्या’ कृतीवर नेटकरी भडकले, म्हणाले…

Tags: Famous Actor Buys New Car Videomarathi actormarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Ganesh Vandana
Entertainment

बाप्पाच्या भक्तीत रंगणार ‘आली मोठी शहाणी’ मधील ‘गणेश वंदना’,

सप्टेंबर 12, 2026 | 10:16 am
Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Next Post
Kamali Promo Update

'कमळी' मालिकेत मोठा TWIST! आजीचा विश्वासघात, कमळीला कानाखाली मारली अन् घराबाहेर काढलं

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.