शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Appi Aamchi Collector : अमोलमुळे अप्पी-अर्जुनमध्ये जवळीक, पुन्हा बहरणार प्रेम, कायमचं एकत्र येणार का?

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 21, 2024 | 4:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Aamchi Collector marathi serial update Appi-Arjun will see the coming together for Amol

Appi Aamchi Collector मालिकेत अप्पी-अर्जुन अमोलमुळे येणार एकत्र, नवीन प्रोमो व्हायरल

Appi Aamchi Collector : झी मराठीवर अल्पावधीतच लोकप्रिय झालेली ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका दिवसेंदिवस रंजक वळण घेत आहे. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने तब्बल आठ वर्षांचा लीप घेतला होता. लीपपूर्वी सरकारनेच अर्जुनच्या आईचा खून केल्याचे सत्य सर्वांसमोर आलेले. विशेष म्हणजे हे सत्य अप्पीला माहिती असून सुद्धा तिने आपल्यापासून ते लपवलं यामुळे अर्जुनने तिच्यापासून दुरावा निर्माण केलेला. म्हणूनच ते दोघं वेगळे राहू लागलेले. आठ वर्षानंतर अप्पी तिचा मुलगा अमोलला घेऊन पुन्हा एकदा पुण्यात राहायला येते आणि मग अर्जुनची त्यांच्याशी भेट होते. (Appi Aamchi Collector Serial Update)

अमोलमुळे अप्पी व अर्जुन एकमेकांबरोबर राहू लागतात, पण तरीही त्यांना एकमेकांच्या काही गोष्टी पटत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात सतत खटके उडत असतात. अप्पी व अर्जुन आपापल्या तत्त्वांवर ठाम राहत असल्यामुळे त्यांच्यात सतत खटके उडत असतात. पण अमोल त्यांना सतत एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतो. नुकताच मालिकेत अमोलला आजार झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे त्याच्याकडे फक्त काहीच दिवस शिल्लक असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र तरीही अमोल आपल्या आई-बाबांना एकत्र आणत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

अशातच मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यातून अप्पी व अर्जुन यांना अमोल पुन्हा एकदा एकत्र आणत असल्याचे पाहायला मिळत आहे. घरात अर्जुन व अप्पी एकत्र असताना अमोल बाहेर जातो आणि बाहेरून दरवाज्याची कडी लावतो आणि अखेर अनेक दिवस अबोल असलेले अप्पी-अर्जुन पुन्हा एकदा एकमेकांशी बोलू लागतात. यावेळी अप्प्पी अर्जुनला असं म्हणते की, “अर्जुन जे काही झालं त्यासाठी मी सॉरी म्हणते”.

आणखी वाचा – “‘आई कुठे..’चं पुराण एकदाचं संपणार”, नव्या मालिकेचा प्रोमो आल्यानंतर प्रेक्षकांच्या कमेंट, म्हणाले, “अरुंधतीची मालिका…”

यापुढे अर्जुनही तिला असं म्हणतो की, “त्यावेळी मी नुसता राग-राग न करता तुला समजून घेतलं असतं, तर तुझ्या आणि अमोलबरोबरच्या सात वर्षांना मी मुकलो नसतो”. यापुढे तो “आपण दोघे एकत्र राहू आणि अमोलला एकत्र मोठं करु” असं म्हणतो. यानंतर अप्पी व अर्जुन दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. मालिकेचा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. अनेकांनी अशा अनेक प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा – श्वेता शिंदेंनीही सेलिब्रिट केला करवाचौथ, नवऱ्यासह दिल्या खास पोझ, पारंपरिक लूकमधील फोटो समोर

दरम्यान, ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत नुकत्याच आलेल्या या नवीन ट्विस्टची गेले काही दिवस प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. अप्पी व अर्जुन यांनी एकत्र यावे असे अनेक चाहते मंडळी म्हणत होते. अखेर चाहत्यांनी ही इच्छा पूर्ण होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.

Tags: appi aamchi collectormarathi serialMarathi Serial News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Marathi CID serial update date and time announced see the details

ठरलं! मराठी CID 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जबरदस्त प्रोमोने वेधलं लक्ष, उत्सुकता शिगेला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.