मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंगावर सूज, हिमोग्लोबिन कमी आणि…; तीन महिन्याच्या आजारपणानंतर ‘थोडं तुझं…’ फेम अभिनेत्री सेटवर परतली, म्हणाली, “रक्ताच्या चाचण्या…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 19, 2025 | 10:51 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Manasi Ghate illness

अंगावर सूज, हिमोग्लोबिन कमी आणि…; तीन महिन्याच्या आजारपणानंतर 'थोडं तुझं…' फेम अभिनेत्री सेटवर परतली, म्हणाली, "रक्ताच्या चाचण्या…"

Manasi Ghate illness : कलाकार हा नेहमीच कोणत्याही संकटाला सामोरे जात त्यावर मात करुन पुढची वाट शोधतो. घर, कुटुंब, मित्र-परिवार यांपासून दूर राहत दिवस-रात्र, ऊन-वारा-पाऊस याचा कसलाही विचार न करता ही मंडळी शूटिंग करतात. यांत बरेचदा कलाकारांच्या तब्येतीही बिघडतात, मात्र कोणतेही कारण न देता झेपेल तसं हे कलाकार शूटिंगसाठी सेटवर येतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने आजारपणाचा लढा देत पुन्हा नव्या जोमाने कामावर परतली असल्याचं समोर आलं आहे. ‘थोडं तुझं थोडं माझं’ या मालिकेत छाया ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी घाटे हिने आजारपणाला सामोरं जात लढा दिला आहे. मालिकेत मानसीने खलनायकाची भूमिका साकारली आहे. आता मानसी तीन महिन्याच्या आजारपणानंतर पुन्हा एकदा मालिकेत परतली आहे.

सेटवर येताच मालिकेतील कलाकारांनी मानसीच कौतुक केलं आणि तिचं भरभरुन स्वागत केलं आहे. मानसीने आजारपणातील काही फोटो शेअर करत, त्यावर लिहिलं आहे की, “सतत अंगावर सूज येत होती आणि हिमोग्लोबिन कमी होत होते. त्यानंतर रक्ताच्या चाचण्या झाल्या. बायोप्सी, वॉटर टॅपिंग, एन्डोस्कोपी असं बरंच काही केलं. रोज स्वतः ला मॉनिटर करणं आणि खूप गोळ्या खाणं, हे सुरु होतं”.

आणखी वाचा – “प्रत्येकजण कुणाकडून तरी दुखावले गेलो”, तेजस्विनी पंडितच्या भावुक पोस्टची चर्चा, म्हणाली, “काही जखमा…”

पुढे जेव्हा ती बरी होऊन सेटवर परतली तेव्हा सेटवरील सर्वांनी तिचं स्वागत केले, याचा व्हिडीओ तिने शेअर केला. त्यावर लिहिले, “अखेर तीन महिन्यांच्या आरामानंतर मी पुन्हा एकदा कामाला सुरुवात करणार होते. मनात थोडी भीती होतीच. मला हे झेपेल का? मी इतका वेळ शूटिंग करु शकेल का? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. पण स्वामींची कृपा आणि माझ्या प्रोड्यूसर, दिग्दर्शक, सहकलाकार, माझं कुटुंब, मित्र परिवार या सर्वांच्या भक्कम आधारामुळे आणि त्यांच्या विश्वासामुळे आज मी उभी राहू शकले”.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

पुढे तिने लिहिले, “आपल्यावर प्रेम करणारे इतके लोक आपल्या आजुबाजूला आहेत, हे पाहून मन पुन्हा पुन्हा भरुन येत होतं. माझी आई, दादा, वहिनी, नवरा आणि बाकीचे नातलग या सर्वांनाच खूप आधार दिला. हे माझे सहकलाकार नसून माझे दुसरे कुटुंब आहे. रोज फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस करणं आणि या आजारातून लवकरात लवकर बाहेर पडावं यासाठी सगळेच आपापल्या परीने प्रयत्न करत होते. आपल्या पडत्या काळात आपले जवळचे आणि आपण जोडलेली माणसं आपल्या मदतीला येत असतात”.

आणखी वाचा – कॅन्सरमुळे किरण खेर यांची अशी अवस्था झाली का?, सुजलेला चेहरा, थकलेलं शरीर पाहून सारेच हैराण, व्हिडीओ समोर

तिने हा व्हिडीओ शेअर करत त्याखाली कॅप्शन देत असं म्हटलं की, “एकाच या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मले मी. खरंच मी काय बोलू कळत नाहीये. आभार मानून परकं कोणाला करायचं नाही. पण आजवर आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींवर मात करुन आज मी तुमच्या बरोबर परत त्याच जोमाने उभी आहे कारण- फक्त तुम्ही सगळे माझ्या पाठीशी स्वामींच्या रुपात उभे आहात”.

Tags: Manasi Ghatemarathi actressthoda tuz thoda maz
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Aftab Shivdasani casting couch

रात्री उशिरा कॉल करायचा आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाला, "हॉटेलवर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.