सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्वतःचं मुल नसल्याची अनुपम खेर यांना खंत, सावत्र लेक असूनही…; म्हणाले, “किरण गरोदर राहिली पण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 17, 2025 | 3:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Anupam kher talk about kids

स्वतःचं मुल नसल्याची अनुपम खेर यांना खंत, सावत्र लेक असूनही...; म्हणाले, “किरण गरोदर राहिली पण...”

बॉलिवूडमधील टॉपच्या कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अनुपम खेर. अनुपम यांनी आजवर चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. जगभरात त्यांचे लाखो चाहते आहेत. अनुपम यांनी त्यांच्या कामात यशाचं शिखर गाठलं. मात्र खासगी आयुष्यात एक खंत कायमच त्यांच्या मनात राहिली. अनुपम व त्यांची पत्नी किरण खेर यांना मुल नाही. यामुळे आता एकटेपणा नकोसा वाटतो असं अनुपम यांचं म्हणणं आहे. लग्नाला ४० वर्ष होऊन गेली, शिवाय वयाचीही साठी ओलांडल्यानंतर मुल नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. अनुपम व किरण दोघांनाही मुल नसल्याची जाणीव आता होत आहे. पहिल्यांदाच त्यांनी याबाबत खुलेपणाने बोलून दाखवलं. (Anupam kher talk about kids)

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अनुपम यांनी मुल नको हा निर्णय का घेतला? याबाबत सांगितलं. खरं तर किरण गरोदर राहतच नव्हता. काही शारिरीक कारणास्तव त्यांना गरोदरपणात अडचणी निर्माण होऊ लागल्या. म्हणूनच त्यांनी पुढे मुलं होतील हा विचारच सोडून दिला. यासाठी दोघांचंही एकमत होतं. सुरुवातीच्या काळात मुल नाही म्हणून त्रास झाला नाही. पण आता मुल हवं होतं असं त्यांना वाटू लागलं आहे.

आणखी वाचा – देशभरातील नव्या दमाच्या स्क्रीनरायटर्ससाठी ‘झी रायटर्स रूम’ची मोठी संधी, कंटेंटविश्वाचा चेहरा घडणार आणि…

View this post on Instagram

A post shared by Kirron Kher (@kirronkhermp)

वयाची ६० वर्ष ओलांडल्यानंतर मुल असायला हवं हा विचार त्यांच्या मनात आला. अनुपम म्हणाले, “मी मुलांबरोबर खूप काम केलं आहे. माझ्या फाऊंडेशननेही काम केलं आहे. मला मुलं खूप आवडतात. मी एक मुलांचा शोच करायचो. तुम्ही मुलांबाबत काही फिल करु शकता का? असं मला कोणीतरी विचारलं. तेव्हा मी उत्तरही हो असं दिलं होतं. स्वतःचं मुल असणं ही काय भावना असू शकते याची मला कल्पना आहे”.

आणखी वाचा – धर्मासाठी सोडली इंडस्ट्री, मुस्लिम मुलाशी लग्न आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्री जगतेय असं आयुष्य, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली…

किरण यांना पहिल्या लग्नापासून मुलगा (सिकंदर) आहे. अनुपम यांच्याशी लग्न झाल्यानंतर किरण यांना प्रेग्नंसीसाठी अडचणी आल्या. त्यातही त्या खूप प्रयत्नांनंतर गरोदर राहिल्या. मात्र मुलाची तेवढी वाढ न झाल्याने प्रेग्नंसी पूर्ण होऊ शकली नाही. अनुपम यांनी सिकंदरबाबत सांगितलेलं की, “सिंकदरबरोबर मी खूश नाही असं काहीच नाही. मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा खूप आनंद होतो. मी याबाबत बोलणं टाळूही शकत होतो. मात्र तसं मी करणार नाही. कारण हा काही माझ्या आयुष्यातील वाईट अपघात नाही”. किरण यांच्या पहिल्या लग्नाच्या मुलाबरोबरही अनुपम खूश आहेत.

Tags: anupam kherbollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Kriti Sanon Javed Jaffrey Building

कॅमेरासमोर अश्लील चाळे, लिफ्टची तोडफोड आणि…; बॉलिवूड कलाकारांच्या राहत्या इमारतीत अज्ञात व्यक्ती शिरली, धक्कादायक प्रकार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.