Zee Writers Room : ‘झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस लिमिटेड’ (झी) हे अग्रगण्य कंटेंट आणि तंत्रज्ञान पॉवरहाऊस ‘झी रायटर्स रूम’ ची अभिमानाने घोषणा करत आहेत. हा एक लॅन्डमार्क उपक्रम असून यातून देशभरातील युवा आणि भावी पटकथा लेखकांना शोधून त्यांचे संवर्धन करण्याचे त्यांचे उद्दिष्ट्य आहे. ‘झी रायटर्स रूम’ हा केवळ एक टॅलेंट हंट नाही, तर ‘युअर्स ट्रुली, झी’ या कंपनीच्या ब्रँड तत्त्वज्ञानाशी सुसंगत असलेली एक सर्जनशील चळवळ आहे. विविध प्लॅटफॉर्म्सवरील झीच्या कंटेंटचा दर्जा उंचावण्याचा हा उपक्रम आहे. नव्या दृष्टिकोनांची मागणी असलेल्या या काळात, या उपक्रमाचा उद्देश हा अस्सल कथा सांगण्याची क्षमता असलेल्या नवोदितांना व्यावसायिक पटकथालेखनाच्या जगाशी जोडणे हा आहे. या माध्यमातून निवडले गेलेले लेखक झीच्या टीव्ही, डिजिटल आणि चित्रपट प्लॅटफॉर्म्ससाठी कथा लिहिण्याची संधी मिळवू शकतील.
‘झी’च्या सेंट्रल कंटेंट आणि प्रादेशिक टीम्सच्या पुढाकाराने राबवण्यात येणारा हा उपक्रम, भारताच्या सातत्याने विकसित होत असलेल्या मनोरंजन विश्वाच्या गरजा आणि देशभरातील न टिपल्या गेलेल्या प्रतिभा यांच्यातील दुवा साधण्याचे काम करणार आहे. ‘झी रायटर्स रूम’ या उपक्रमाची घोषणा सात भारतीय भाषांमध्ये करण्यात आलेल्या मनाला भिडणाऱ्या ब्रँड फिल्मद्वारे करण्यात आली. या फिल्मच्या उद्देश एकच आहे “उद्याचे लेखक घडवणे.” ही एकसंध अशी दूरदृष्टी या फिल्मच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
८० शहरांमध्ये आणि ३२ कार्यक्रम केंद्रांमध्ये राबवला जाणारा हा उपक्रम ऑन-एअर, डिजिटल आणि ऑन-ग्राऊंड प्लॅटफॉर्म्सवरून चालवलेल्या जोरदार प्रचार मोहिमेमुळे आणखी प्रभावी ठरत आहे. या उपक्रमाचा उद्देश मराठी, हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमधील प्रतिभावान कथाकारांना शोधून त्यांना एक अद्वितीय संधी देणे हाच आहे — ही एक अशी सहयोगी रायटर्स रूम आहे जिथे कल्पकता, शिस्त आणि रचनात्मक कलेला वाव मिळेल.
ह्या ७० नवोदित लेखक आणि ३० उदयोन्मुख तज्ज्ञ लेखक कलाकारांना आणि त्यांच्या संकल्पनांना टीव्ही, ओटीटी आणि चित्रपट माध्यमांमध्ये जोडण्यासाठी झी कटिबद्ध आहे. या नवोदित लेखकांना झीच्या कंटेंटसाठी नव्या कथा, आकर्षक नवीन जग, प्रभावी पात्ररचना आणि बांधेसूद कथानकांमध्ये रूपांतरित करणाऱ्या एका आयडिया-जेनरेशन इंजिन मध्ये घडवले जाईल. नोंदणीसाठी भेट द्या: [www.zeewritersroom.com]
आणखी वाचा – “एक इमेज डागाळली आणि…”, शरद उपाध्ये प्रकरणावर निलेश साबळे पुन्हा बोलले, म्हणाले, “आता माझेच लोक…”
प्रत्येक सहभागी लेखकाला खालील प्रक्रियेतून जावे लागेल:
- लेखी चाचणी: नोंदणी केलेल्या सहभागींच्या निवड कार्यक्रमादरम्यान लेखी परीक्षा घेतली जाईल.
- सादरीकरणाचे मूल्यमापन: लेखन गुणवत्तेच्या आधारे एक रीडिंग कमिटी सर्वोत्तम १० टक्के उमेदवारांची निवड करेल.
- मुलाखत प्रक्रिया: अंतिम फेरीत पोहोचलेल्या उमेदवारांचे मूल्यमापन या क्षेत्रातील तज्ज्ञ पॅनेलद्वारे केले जाईल.
- झी रायटर्स रूममध्ये समावेश: निवड झालेल्या सर्वोत्तम १०० लेखकांना ‘झी रायटर्स रूम’मध्ये सहभागी करून घेतले जाईल, जिथे ते तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली कथा कल्पना विकसित केल्या जातील.
तर मग वाट कसली पाहताय? उद्याच्या कंटेंटविश्वाचा चेहरा घडवण्यासाठी ‘झी रायटर्स रूम’मध्ये आजच सामील व्हा !





