बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कॅमेरासमोर अश्लील चाळे, लिफ्टची तोडफोड आणि…; बॉलिवूड कलाकारांच्या राहत्या इमारतीत अज्ञात व्यक्ती शिरली, धक्कादायक प्रकार

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 17, 2025 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kriti Sanon Javed Jaffrey Building

कॅमेरासमोर अश्लील चाळे, लिफ्टची तोडफोड आणि…; बॉलिवूड कलाकारांच्या राहत्या इमारतीत अज्ञात व्यक्ती शिरली, धक्कादायक प्रकार

Kriti Sanon Javed Jaffrey Building : कृति सेनन, जावेद जाफरी आणि क्रिकेटर केएल राहुल तसेच अभिनेत्री अथिया शेट्टी ही कलाकार मंडळी ज्या इमारतीत राहतात त्यात एका अज्ञात व्यक्तीने जबरदस्तीने प्रवेश केला असल्याचं समोर आलं. अज्ञात व्यक्तीने एखाद्या इमारतीत जबरदस्तीने प्रवेश करण्याची ही काही पहिली वेळ नाही. अशातच बॉलिवूड कलाकार ज्या इमारतीत राहतात त्यात अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला आणि लिफ्टची तोडफोड केली. तिने कॅमेराकडे पाहत अश्लील हावभाव देखील केले. या घटनेबद्दल तक्रार केली गेली आहे. इमारतीच्या सुरक्षा व्यवस्थापक उमेश सारटे यांनी खार पोलिस स्टेशनमध्ये या प्रकारानवरुन तक्रार केली आहे.

अहवालानुसार इमारतीत प्रवेश करणारी अज्ञात व्यक्ती ओळखली गेली आहे. सध्या या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले आहे. एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, पाली हिलच्या पॉश भागात असलेली हाय प्रोफाइल इमारत ‘संधू पॅलेस’ येथे काल रात्री उशिरा एक माणूस गाडीतून आला. त्याने सुरक्षा रक्षकाला १७ व्या मजल्यावर जाण्यास सांगितले. त्या मजल्याच्या मालकाने रक्षकांना भेटायला येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस न पाठविण्यास सांगितले. अशा परिस्थितीत या व्यक्तीने इमारतीत प्रवेश केला. त्या माणसाने तळघरात गाडी पार्क केली आणि तो इमारतीच्या वॉशरूममध्ये गेला.

आणखी वाचा – कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करला भेटायला आले वडील, लेकीला पाहताच झाले भावुक, अभिनेत्रीलाही अश्रू अनावर

मग आणखी एका गार्डला १४ व्या मजल्यावर जाण्यास सांगितले. जेव्हा गार्डने त्या मजल्याच्या मालकाला कॉल केला तेव्हा कोणीही कॉल उचलला नाही. मग त्याने १७ व्या मजल्यावर परत जाण्यास सांगितले. संशयावरुन, त्या माणसाला इमारतीच्या बाहेर काढण्यात आले. यानंतर, दुसर्‍या दिवशी सकाळी लिफ्ट बंद झाल्यानंतर जेव्हा ती उघडली गेली तेव्हा त्यात मोठा दगड ठेवल्याचे निदर्शनास आले.

आणखी वाचा – देशभरातील नव्या दमाच्या स्क्रीनरायटर्ससाठी ‘झी रायटर्स रूम’ची मोठी संधी, कंटेंटविश्वाचा चेहरा घडणार आणि…

या प्रकरणाचा तपस घेताना जेव्हा सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले तेव्हा लिफ्टची तोडफोड केल्यावर ती व्यक्ती कॅमेराकडे पहात अश्लील हावभाव करीत असल्याचं दिसलं. या इमारतीत, जावेद जाफरीचा एक विलासी फ्लॅट आहे, ज्यामध्ये फराह खान तिच्या युट्युब चॅनेलच्या शूटसाठी गेली होती. त्याने एक व्हीलॉग तयार केला आणि घराचा कोपरा त्यात दाखविला होता.

Tags: bollywood actorjaved jaffreykriti sanon
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Next Post
Marathi film Avkarika

पथनाट्याच्या सादरीकरणातून ‘अवकारीका’ चित्रपटाचे हटके प्रमोशन, सामाजिक भान जपणारी नवी कलाकृती समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.