सध्या मराठी चित्रपटसृष्टीत एकामागोमाग एक चित्रपटांची रांग लागली आहे. अशातच काही दिवसांपूर्वी ‘अंकुश’ या नव्या कोऱ्या ऍक्शनपटाची सोशल मीडियावर जोरदार हवा होती. हा सिनेमा लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिनेमातील आतापर्यंत अनेक कलाकारांचे फर्स्ट लुक समोर आलेले आहे. आता या सिनेमाचं नवं पोस्टर समोर आलं आहे. या नव्या पोस्टरमध्ये मराठीतला पहिला सिक्स पॅक अभिनेता चिन्मय उदगीरकर एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. (ankush movie new poster)
‘ओमकार फिल्म्स क्रिएशन’ प्रस्तुत तसेच निर्माते राजाभाऊ आप्पाराव घुले निर्मित ‘अंकुश’ हा बिग बजेट ऍक्शनपट ६ ऑक्टोबरला सिनेमागृहात येण्यास सज्ज होत आहे. आतापर्यंतच्या पोस्टरमध्ये अभिनेत्री केतकी माटेगावकर, अभिनेते सयाजी शिंदे, मंगेश देसाई यांच्या पात्रांची ओळख झाली. आता चिन्मय उदगीरकर ‘भोसले भाई’ या आगळ्यावेगळ्या पात्रांमधून प्रेक्षकांना दिसणार आहे. त्यामुळे ‘अंकुश’ या वादळाची सध्या सिनेसृष्टीत चर्चा असतानाच चित्रपटाच्या नव्या पोस्टरने हे वादळ आणखी गोंगावत आहे. (chinmay udgirkar in ankush movie)
कोण असेल अंकुश चित्रपटाचा नायक ? (Who will be the hero of ‘ankush’ movie ?)
अभिनेता चिन्मय उदगीरकर ‘अंकुश’ चित्रपटात ‘भोसले भाई’ हे पात्र साकारणार आहे. विशेष म्हणजे, चिन्मय या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एका रांगड्या भूमिकेत दिसणार आहे. जे नक्कीच रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे असेल. या पोस्टरमध्ये अभिनेता चिन्मय एकदम ऍक्शनपॅक अवतारात दिसत असून चाहते त्याच्या या भूमिकेला पसंती दर्शवत आहे. ऍक्शन आणि रोमान्स अशा दुहेरी धुरा सांभाळणारा ‘अंकुश’ हा नायक लवकरच रुपेरी पडदा गाजवायला सज्ज होत आहे. यामध्ये अभिनेत्री केतकी माटेगावकर, अभिनेते सयाजी शिंदे, मंगेश देसाई, चिन्मय उदगीरकर आदी कलाकार मंडळी दिसणार आहे. मात्र या चित्रपटाचा नायक कोण आहे, याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे.
‘ओमकार फिल्म्स क्रिएशन’ प्रस्तुत ‘अंकुश’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माते राजाभाऊ आप्पाराव घुले यांनी सांभाळली असून चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक निशांत धापसे यांनी केलं आहे. तर चित्रपटाची कथा ही नामदेव मुरकुटे यांची आहे. लवकरच हा बिग बजेट ऍक्शनपट नव्याकोऱ्या चेहऱ्यासह बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सज्ज होणार आहे. (ankush movie new poster)
हे देखील वाचा : केतकीच्या Opposite दिसणार, रोमान्स, ऍक्शनचा पॉवरपॅक असा तडफदार सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का कोण आहे हा अभिनेता?