महाराष्ट्राचे लाडके दादूस,म्हणजेच अभिनेते अरुण कदम त्यांच्या आगरी-कोळी स्टाईलने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतात.त्यांच्या विनोदाचं टायमिंग कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मधून सध्या ते प्रेक्षकांच्या भेटीस येत होते.(arun kadam daughter)
तुरताच या शोने ब्रेक घेतला आहे. तर अरुण कदम आणि त्यांची मुलगी सुकन्या कदम ही बाप-लेकीची जोडी देखील सोशल मीडियावर विशेष चर्चेत असते. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतात. हे बाप-लेकीचं बॉण्डिंग देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत.
पाहा सुकण्याचं पारंपरिक लूकमधील खास मॅटर्निटी फोटोशूट (arun kadam daughter)
सध्या अरुण कदम आजोबा होणार आहेत. त्यामुळे लेकीची काळजी घेण्यात ते व्यस्त आहेत. नुकत्याच इट्स मज्जाला दिलेल्या एका मुलाखतीत सुकन्याने व तिच्या आईने अरुण कदम सुकण्याची काळजी कशी घेतात या बदल सांगितलं आहे.अरुण कदम यांची पत्नी म्हणाली की पहिली मुलगी असेल जी गरोदरपणात रोज बाबांसोबत वॉकला जाते. तर सुकन्या म्हणते अरुण कदम प्रत्येक गोष्ट तिला हातात आणून देतात.(arun kadam daughter)
तर सुकन्याच डोहाळेजेवण देखील अगदी थाटात पार पडलं. सुकन्या तिच्या आयुष्यातील या महत्वाच्या टप्य्याचा भरभरून आनंद घेते आहे. यातच सुकण्याने नुकतंच मॅटर्निटी शूट केलं आहे. अत्यंत पारंपरिक लुक मध्ये सुकन्या आणि तिचा पती सागर या शूट साठी तयार झाले आहेत. नवरी साडी, पारंपरिक दागिने यात सुकन्याच रूप अगदी खुलून आलं आहे, तर धोतर, टोपी असा पेहराव सागरने केलेला पाहायला मिळतो आहे. यांच्या या मॅटर्निटी शूटचे काही फोटोज सुकण्याने ‘आई होणे ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदची भावना असते’. असं कॅप्शन देत शेअर केले आहेत.(sukanya kadam maternity photoshoot)
हे देखील वाचा : पायलट झाली शरद पोंक्षेंची लेक, फोटो शेअर करत म्हणाले, “माझं आजारपण, खडतर परिस्थिती अन्…”