मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

केतकीच्या Opposite दिसणार, रोमान्स, ऍक्शनचा पॉवरपॅक असा तडफदार सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का कोण आहे हा अभिनेता?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 22, 2023 | 4:09 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
New Upcoming Superstar in Ankush

New Upcoming Superstar in Ankush

सध्या एकामागोमाग एक चित्रपटांची रांग लागली आहे. अशातच काही दिवसांपूर्वीच ‘अंकुश’ या ऍक्शनपटाने सोशल मीडियावर धुमाकूळ केला. लवकरच हा सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची बातमी मिळाली, दरम्यान अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या ‘अंकुश’ या चित्रपटातील लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आता केतकीच्या या पोस्टरनंतर आणखी एका पोस्टरने साऱ्यांची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. (New Upcoming Superstar in Ankush)

‘ओमकार फिल्म्स क्रिएशन’ प्रस्तुत तसेच निर्माते राजाभाऊ अप्पाराव घुले निर्मित ‘अंकुश’ हा बिग बजेट ऍक्शनपट ६ ऑक्टोबरला सिनेमागृहात येण्यास सज्ज होत आहे. ‘अंकुश’ या वादळाची सध्या सिनेसृष्टीत चर्चा असतानाच चित्रपटाच्या नव्या पोस्टरने ही चर्चा आणखी रंगतदार केली आहे. हातात हातोडा घेऊन पाठमोरी उभी असलेली व्यक्ती, समोर आलेल्या संकटाना अजिबात न जुमानता खंबीर उभी असलेली ही व्यक्ती नेमकी कोण आहे याकडे आता साऱ्यांचं लक्ष लागून राहील आहे.

View this post on Instagram

A post shared by AnkushTheFilm (@ankushthefilm)

ऍक्शन आणि रोमान्स अशा दुहेरी धुरा सांभाळणारा ‘अंकुश’ हा नायक लवकरच रुपेरी पडदा गाजवायला सज्ज होत आहे. मराठमोळ्या तसेच मेहनती स्वभाव आणि नवीन गोष्टी शिकण्याची जिद्द असलेल्या या नायकाच्या हाती ‘अंकुश’ चित्रपटासारखा माईल स्टोन आला आहे, अशातच चित्रपटाच्या त्याच्या पाठमोऱ्या पोस्टरवरील लूकनेच त्याचा चित्रपटातील अभिनय डोळ्यासमोर येत आहे, नक्कीच या सिनेमातील या नायकाची भूमिका वाखाणण्याजोगी असेल यांत वादच नाही. मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेला हा नवाकोरा चेहरा व बहुगुणी अभिनेता नक्की कोण आहे याकडे आता रसिक प्रेक्षकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

अंकुश मधल्या नायकाला तुम्ही ओळखलंत का कोण आहे हा अभिनेता? (New Upcoming Superstar in Ankush)

‘ओमकार फिल्म्स क्रिएशन’ प्रस्तुत ‘अंकुश’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माते राजाभाऊ अप्पाराव घुले यांनी सांभाळली असून चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक निशांत धापसे यांनी केलं आहे. तर चित्रपटाची कथा ही नामदेव मुरकुटे यांची आहे. लवकरच हा बिग बजेट ऍक्शनपट नव्याकोऱ्या चेहऱ्यासह बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सज्ज होणार आहे.

Tags: ankush filmankush upcoming movieketaki mategaonkat
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Suchitra Bandekar Struggle story

'..म्हणून सुचित्रा ५०० रुपयांचं खोटं मंगळसूत्र वापरत होती' म्हणत आदेश बांदेकरांनी शेअर केला किस्सा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.