शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “विकीच्या कुटुंबाला…”, सुशांत सिंह बद्दल सतत बोलण्यावरून अंकिता लोखंडेला तिच्याच आईने टोकलं, म्हणाल्या, “तुझा नवरा…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 12, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
ankita lokhandes mother told actress dont take a name actor sushant singh rajput see the details

Bigg Boss 17 : “विकीच्या कुटुंबाला...”, सुशांत सिंह बद्दल सतत बोलण्यावरून अंकिता लोखंडेला तिच्याच आईने टोकलं, म्हणाल्या, “तुझा नवरा...”

Bigg Boss Updates : कलर्स वाहिनीवरील चर्चेत राहणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. यंदाचे ‘बिग बॉस’ १७ वे पर्व हे चांगलेच गाजलेले पाहायला मिळाले. हा शो आता अंतिम टप्प्यात आला असून घरात फक्त ९ स्पर्धक राहीले आहेत. अशातच ‘बिग बॉस’ने सर्व स्पर्धकांना एक खास भेट दिली आहे. हा शोच्या अंतिम भाग होण्यापूर्वी ‘बिग बॉस’ सर्व स्पर्धकांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट करुन देणार आहे. त्यामुळे येत्या ‘फॅमिली स्पेशल’ वीकमध्ये अंकिता व विकीची आई ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता व विकी हे दोघे त्यांच्या आईंना पाहून आनंदी व भावुकही झाले असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान अंकिता लोखंडेच्या आईने आपल्या मुलीला शोमध्ये तिच्या एक्स बॉयफ्रेंड (सुशांत सिंह राजपूत) बद्दल बोलू नकोस अशी सूचना केली आहे. अंकिता लोखंडेची आई आपल्या लेकीबरोबर संवाद साधताना पती विकीबरोबर नम्रपणे वागण्याचा सल्ला दिला. नॅशनल टीव्हीवर अशाप्रकारे त्यांची एकमेकांशी होणारी भांडणं व वाद याचा प्रेक्षकांसमोर चुकीचा संदेश जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

हेही वाचा – सिद्धार्थ-सईचा लिपलॉक, धमाल कॉमेडी अन्…; ‘श्रीदेवी प्रसन्न’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, तुम्ही पाहिलात का?

तसेच वंदना लोखंडेने आपल्या मुलीला समजावताना असेही म्हटले की, तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलणे थांबवले पाहिजे. कारण आता विकी जैन हा तिचा नवरा आहे आणि सुशांतबद्दल तिचे हे असे सारखेसारखे बोलणे विकीला मान्य नाही. तसेच त्याच्या कुटुंबालाही ते आवडत नाही.

हेही वाचा – टीआरपीच्या शर्यतीत ‘ठरलं तर मग’ मालिकेची बाजी, पण या मालिकांचा प्रेक्षकवर्ग घसरला, पाहा संपूर्ण यादी

दरम्यान, आईचे म्हणणे ऐकून अंकितानेही भविष्यात असे बोलणार नसल्याचे सांगितले आणि तिच्या या कृत्यामुळे विकीच्या घरच्यांना कोणत्याही प्रकारची लाज वाटू नये यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे आगामी भागांत विकी-अंकिताच्या नात्यात काय फरक पडणार?, अंकिता सुशांतबद्दल खरच उल्लेख करणार की नाही? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Tags: ankita lokhandeankita lokhande motherbigg bossbigg boss 17bigg boss newsBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsVandana Lokhandevicky jainअंकिता लोखंडेअंकिता लोखंडे आईबिग बॉसबिग बॉस 17बिग बॉस बातमीबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमीवंदना लोखंडेविकी जैन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेने सासूसमोर केला विकी जैनबरोबरच्या नात्याचा खुलासा, म्हणाली, "तुम्ही कधीच आमच्याबरोबर राहिला नाहीत म्हणून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.