Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’च्या घरामध्ये विकी जैनची आई म्हणेजच अभिनेत्री अंकिता लोखंडेची आई आल्यापासून ती विशेष चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. विकीची आई रंजना जैन यांनी घराबाहेर येताच केलेलं भाष्यही चर्चेत आलं आहे. यावेळी त्यांनी त्यांची सून अंकिताबद्दलही बरच भाष्य केलेलं पाहायला मिळत आहे. विकीच्या आईने अंकिताबद्दल केलेलं भाष्य अभिनेत्रीच्या चाहत्यांना खटकलं असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकजण अंकिताच समर्थन करत आहेत. काहीजण विकीच्या आईवर टीका करताना दिसत आहेत.
अंकिताला पाठिंबा दर्शवत रश्मी देसाईपासून सनी आर्याची पत्नी दीपिका आर्या तसेच कंगना रणौत या कलाकारांनी पोस्ट शेअर केल्या आहेत. अशातच आता अंकिताच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे. अंकिताची आई वंदना लोखंडे यांनी नुकतीच इटाइम्सला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी त्यांना आलेला ‘बिग बॉस’चा अनुभव तसेच त्यांच्या मुलीबद्दल, जावयाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी बोलताना त्यांनी अंकिताच्या सासूचाही उल्लेख केला.
वंदना लोखंडे अंकिताबद्दल भाष्य करत म्हणाल्या की, “आयुष्यात खूप दु:ख सोसले आहे. पण तरीही ती खूप मजबूत आहे. ती नेहमीच कुटुंबाचा महत्त्वाचा भाग राहिली आहे. हा. कधीकधी एखादी व्यक्ती भावनिक होते आणि त्याच्या हातून गोष्टी चुकीच्या घडतात. जे अंकिताला आधीपासूनच ओळखतात त्यांना माहित असेल की ती अशी आहे. ती सर्व काही मनापासून करत असते. तिच्या अनेक मैत्रिणींनी मला मेसेज केले की, अंकिता तिच्याबद्दल वाईट बोलणाऱ्या लोकांसह का आहे. अंकिता अजिबात बदललेली नाही, ती शोमध्ये जशी आहे तशीच आहे” असं त्या म्हणाल्या.
आणखी वाचा – लेकीच्या लग्नासाठी आमिर खानने काढली हातावर मेहंदी, साध्या लूकने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल
अंकिताच्या आईने पुढे सांगितले की, “अंकिताच्या आयुष्यात ती त्या लोकांनाही बरोबर घेऊन जाते ज्यांनी तिच्याबरोबर वाईट केलं आहे. मला माझ्या मुलीचा अभिमान आहे की ती अशी व्यक्ती आहे जी त्यांच्या दुःखातही प्रत्येकाच्या पाठीशी उभी असते. समोरची व्यक्ती तिला तिच्या वाईट काळात साथ देत नसली तरी ती त्यांच्या दुःखात त्यांचा आधार बनते” असं त्या म्हणाल्या.