लहान पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे ही सतत चर्चेत असते. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिने मालिकाविश्वात पदार्पण केले. या मालिकेमुळे तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. नंतर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. पण ‘बिग बॉस १७’ नंतर ती अधिक चर्चेत आली. तिने पती विकी जैनबरोबर सहभाग घेतला होता. पण या सीजनमध्ये विकीबरोबर अनेक वादही झालेले पाहायला मिळाले. नुकतीच ती एका पुरस्कार सोहळ्यामध्ये दिसून आली. तिने सोनेरी रंगाची साडी नेसली होती. त्यामध्ये तिने केलेल्या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. (Ankita Lokhande troll)
अंकिता नुकतीच एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिली होती. त्यावेळी रेड कार्पेटवर फोटोग्राफर्सना पोज देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता फोटोग्राफर्सच्या समोर असताना ती अचानक घाबरली आणि घाबरली. तिच्या या कृतीवर प्रेक्षकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “ओव्हर ॲक्टिंगचे दुकान”, दुसरा नेटकरी लिहितो की, “बस बस आता पदर वर घे”. या प्रतिक्रिया देऊन तिला ट्रोल करण्यात आले आहे. तसेच तिच्या लूकचे अनेकांनी कौतुकही केले आहे.
अंकिताने नुकतीच एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये तिच्याबरोबर कास्टिंग काऊचचा घडलेला भयानक प्रसंग सांगितला होता. मालिका विश्वात येण्याच्या सुरवातीला तिने एका चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. तेव्हा निर्मात्यांकडून चुकीच्या अपेक्षा केल्या होत्या. त्यामुळे ती खूप घाबरली. त्यानंतर मात्र खंबीर होऊन अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. मालिकेनंतर तिने ‘मणीकर्णिका’ या चित्रपटात काम केले. नंतर ती ‘बागी ३’ याही चित्रपटामध्ये दिसली होती. या सर्व चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वांनी कौतुकही केले होते.
आता ती ‘वीर सावरकर’ या चित्रपटामध्ये रणदीप हुड्डाबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट २२ मार्चला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉच झाला असून प्रेक्षकांनी कौतुकही केले आहे.