लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७’मुळे विशेष चर्चेत आली. याशिवाय अभिनेत्री तिच्या ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेमुळे प्रसिद्धीस आली. ‘बिग बॉस’ याशोमध्ये अंकिता अनेकदा तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलताना दिसली. पण सुशांतचा उल्लेख केल्याने अंकिताला बरेचदा ट्रोल करण्यात आले. अभिनेत्रीच्या सासूबाई रंजना जैन म्हणाल्या होत्या की, अंकिता वारंवार सुशांतचे नाव घेऊन सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. या वक्तव्यावर आता अंकिताने मौन सोडलं असून ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. (Ankita Lokhande On Trollers)
अंकिता लोखंडेने नुकतीच ‘झूम’ला मुलाखत दिली. या संभाषणात अभिनेत्रीने सुशांत सिंह राजपूतबद्दल भाष्य केले आहे की, तिला सुशांतबद्दल बोलण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अंकिता म्हणाली, “मला वाटते की हे माझं आयुष्य आहे. जर मी एखाद्याला ओळखते आणि मला त्या व्यक्तीबद्दल काहीतरी चांगले माहित असेल तर मी त्याचा उल्लेख करेन. सुशांतचे नाव घेण्यापासून किंवा त्याचा उल्लेख करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही”. अभिनेत्री पुढे म्हणाली की, “हा तिचा स्वतःचा निर्णय आहे आणि भविष्यातही ती सुशांतबद्दल बोलत राहील. यापलीकडे लोकांनी तिला ट्रोल केलं तर ती त्यांची मर्जी आहे”.
सुशांत सिंह राजपूत व अंकिता लोखंडे यांनी जवळपास ८ वर्षे एकमेकांना डेट केले होते. दोघेही त्यांच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमध्ये भेटले होते. या शोमधूनच त्यांच प्रेम फुललं. त्यांनतर सुशांत व अंकिताने लग्नाचा निर्णय घेतला होता. पण अचानक त्यांचे नाते लग्नाआधीच तुटले. आजही अंकिताला सुशांतची आठवण येते.
सुशांत सिंग राजपूतचे २०२०मध्ये निधन झाले. अभिनेत्याने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आलं, पण सुशांतची हत्या झाल्याचं त्याच्या कुटुंबीयांना व त्याच्या चाहत्यांना वाटतंय. या अभिनेत्याचे निधन होऊन ४वर्षांहून अधिक काळ लोटला असून त्याचे कुटुंब न्यायासाठी अजूनही लढत आहे.