नितीन चंद्रकांत देसाई… कलाविश्वात कलादिग्दर्शक म्हणून ध्रुवताऱ्यासारखे अढळपद मिळवणारे व्यक्तीमत्त्व. ऑस्करच्या अंतिम नामांकनात धडक मिळवणारा आशुतोष गोवारीकर यांचा ‘लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’, ‘पानिपत’ किंवा संजय लीला भन्साळींच्या ‘देवदास’ चित्रपटातील देखण्या व भव्य वास्तू या नितीन यांच्या कलादिग्दर्शनाशिवाय होऊच शकले नसते. जेव्हा जेव्हा ठरावीक काळातील वास्तू, शहरे, रचना उभारण्याचे आव्हान निर्माता-दिग्दर्शकांसमोर उभे राहिले. त्यावर नितीन चंद्रकांत देसाई हे एक उत्तर ठाम होते.
मराठी मनोरंजनविश्वासह हिंदी कलाविश्वातदेखील आपल्या कामाची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नितीन देसाईंनी हॉलिवूडमध्येही आपल्या कामाचा दबदबा निर्माण केला. आपल्या कामाच्या जोरावर नितीन यांना हॉलिवूडमध्येही कलादिग्दर्शक म्हणून बोलवण्यात आले. त्यांनी ‘सलाम बॉम्बे’, ‘कामसूत्र’, ‘जंगल बुक’, ‘सच लॉंग जर्नी’ अशा काही निवडक आंतरराष्ट्रीय चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले. त्यातही खास लक्षात राहिला तो डॅनी बोएल दिग्दर्शित ‘स्लमडॉग मिलेनिअर’ हा चित्रपट.
Nitin Desai in the In Memorium segment – wonderful to have his monumental work recognized internationally.#Oscars2024
— Anupama Chopra (@anupamachopra) March 11, 2024
मात्र गतवर्षी या अवलिया कलाकाराने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे यंदाच्या यंदाच्या ९६व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नितीन देसाईंच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यात आली. ‘इन मेमोरियम’ नावाच्या सत्रात जगभरातील यशस्वी दिवंगत कलावंतांचं स्मरण केलं जाते. त्यामध्ये यंदा नितीन देसाई यांचा उल्लेख करण्यात आला.
गेल्यावर्षी, २ ऑगस्ट २०२३ रोजी दिग्दर्शक, कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतःचं जीवन संपवलं. ‘लगान’ हा चित्रपट २००२ साली ऑस्करला गेला होता. त्याचे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई होते. ‘लगान’ने सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाच्या श्रेणीत अंतिम पाच चित्रपटांत स्थान मिळवले होते. ‘स्लमडॉग मिलेनियर’ या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रपटाचं कला दिग्दर्शनही देसाईंनीच केलं होतं. ‘स्लमडॉग मिलेनियर’या चित्रपटाला ओरिजनल स्कोअर श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
दरम्यान, यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर ‘ओपनहायमर’ चित्रपटाने आपला ठसा उमटवला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारावर ‘ओपनहायनमर’ने आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. त्याशिवाय, ‘ओपनहायनर’ने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात पाच पुरस्कार जिंकले आहेत.