भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला. त्यांच्या विवाहसोहळ्यासाठी जगभरातून अनेकांनी उपस्थिती दर्शवली होती. १२ जुलै रोजी मुंबई येथील जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर येथे या विवाहसोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात केवळ भारतीयच नव्हे तर परदेशातील मोठमोठ्या दिग्गज व्यक्तींनीसुद्धा उपस्थिती लावली होती. केवळ सिनेसृष्टीतीलच नव्हे तर अनेक देशाविदेशातील राजकीय मंडळीसुद्धा या शाही विवाह सोहळ्यात उपस्थित होते. या विवाहसोहळ्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (nita ambani on media)
लग्न झाल्यानंतर १३ व १४ जुलै रोजी दोघांचा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान नीता अंबानी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावेळी व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये त्या मीडिया बरोबर बोलताना दिसत आहेत तसेच त्यांचे आभारदेखील मानताना दिसत आहेत. नीता यांनी मीडियासमोर बोलताना म्हणाल्या की, “तुम्ही इतके दिवस माझ्या अनंत व राधिका यांच्या लग्नासाठी हजर आहात. यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार”.
पुढे त्या म्हणाल्या की, “हे लग्नाचे घर आहे. चुकून काही कमी जास्त झालं असेल तर माफ करा. मला आशा आहे की तुम्ही सर्व आनंदी असाल. तुम्हा सगळ्यांना उद्याचे आमंत्रण मिळाले असेल. उद्या तुम्ही आमचे पाहुणे म्हणून या. मी तुमची वाट बघेन. मी कुटुंबाबरोबर तुमचे स्वागत करेन”. नीता यांच्या बोलण्याने सगळेच जण भारावून गेले होते.
या दरम्याने नीता यांनी कॅमेरासमोर पोजही दिल्या. वेडिंग रिसेप्शनच्या दरम्याने नीता यांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती.यावर त्यांनी डायमंड ज्वेलरी, कपाळावर गुलाबी टिकली व हातातील बांगड्यांमुळे त्या खूप सुंदर दिसत होत्या. त्याचप्रमाणे नीता यांनी केसात गजरादेखील माळला होता. यामुळे त्यांचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते.