मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला स्वामींची प्रचिती, ‘तो’ प्रसंग सांगताना अभिनेता भावुक, म्हणाला, “गाडीत बसलेलो असताना…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 16, 2024 | 11:20 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Comedy express fame Marathi actor Ashish Pawar shared his experience of Swami samartha

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला स्वामींची प्रचिती, ‘तो’ रोमांचक प्रसंग सांगताना अभिनेता भावुक, म्हणाला, “गाडीत बसलेलो असताना…”

“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हे ब्रीद असण्याऱ्या स्वामी समर्थांची प्रचिती देणारी अनेक उदाहरणं तुम्ही पाहिली किंवा वाचली असतील. स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि ते आपल्याला कोणत्याही संकटातून वाचवतात अशी एक श्रद्धा भाविकांची असते. याबद्दल अनेक भाविकांनी सांगितलेही आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारही स्वामी भक्त आहेत आणि या कलाकारांना स्वामींनी प्रचिती दिली आहे. या कलाकारांनी त्यांचे-त्यांचे अनुभव हे अनेकदा शेअरही केले आहेत. अशातच आणखी एका विनोदी कलाकाराने त्याच्या स्वामी भक्तीतून आल्याच्या प्रचितीबद्दलचा खास अनुभव शेअर केला आहे आणि हा अभिनेता म्हणजे आशिष पवार.

‘कॉमेडी एक्सप्रेस’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यासारख्या विनोदी कार्यक्रमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा आशिष पवार हा त्याच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेला हा अभिनेता स्वामी-भक्तही आहे आणि त्याला स्वामींची प्रचितीदेखील आली होती. याबद्दल त्याने ‘इट्स मज्जाच्या ‘मज्जाचा अड्डा’ या खास कार्यक्रमात सांगितले आहे. यावेळी त्याने माझ्या आयुष्यात स्वामींचे महत्त्वाचे स्थान असून माझ्या एका मैत्रिणीमुळे माझी त्यांच्यावरचे श्रद्धा वाढली असंही त्याने म्हटलं आहे.

आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची अनोखी विठ्ठल भक्ती, आईच्या साड्यांपासून केली मूर्तीची सजावट, कौतुकाचा होतोय वर्षाव

याच स्वामी प्रचितीबद्दल बोलताना आशिषने असं म्हटलं की, “आमच्या घरात दत्तगुरुंचा एक फोटो आहे. माझे बाबा त्यांचे खूप मोठे भक्त आहेत. तेव्हा दत्तगुरुंच्या फोटोखालील एक व्यक्ती असायची ती व्यक्ती कोण आहे हे मला माहीत होतं. नंतर मला हळहळू कळत गेलं की, ते स्वामी समर्थ आहेत. तर स्वामींची भक्ती करायची सवय मला माझ्या एका मैत्रिणीमुळे लागली. तर तिने मला दर गुरुवारी मठात जायला सांगितलं, त्यांचं नामस्मरण कर असं सांगितलं आणि मी ते करायला लागल्यानंतर मला काही अनुभव यायले लागले. मी जे जे काही मागितलं ते ते माझ्याकडे आलेलं आहे”.

आणखी वाचा – ‘बिग बॉस ओटीटी ३’मधून ‘हा’ स्पर्धक घराबाहेर, शिवाय ‘हे’ स्पर्धकही ठरले नॉमिनेशनचे बळी, शोमध्ये चाललंय तरी काय?

यापुढे त्याने एक किस्सा सांगतांना असं म्हटलं की, “मी दरवर्षी जानेवारीमध्ये अक्कलकोटला जातोच जातो. जानेवारी महिन्यात मला जमलं नाही तर वर्षभरात कधीना कधी जातोच, अनेक दिवस झाले आणि मला जायला जमलं नाही. यादरम्यान, मीही अनेकदा कंटाळा केला. एकेदिवशी मी गाडीत बसलेलो असताना गाडीतील स्वामींच्या मूर्तीकडे विनंती केली की, मला माहीत आहे, मी कंटाळा करत आहे. पण मला यायचं आहे आणि मी येणार. इतक्यात मला माझ्या पप्पांचा फोन आला आणि त्यांनी त्यांच्या मित्राकडे स्वामींच्या पादुका आल्या आहेत. त्यामुळे आशिषला दर्शन घेऊन जायला सांगा. असं म्हटलं. हे ऐकून माझ्या डोळ्यातून अक्षरश: पाणीच आलं”.                    

Tags: Comedy Express Fame Ashish Pawarmarathi entertainment newsSwami Samarth Experience
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada fame Swapnil Rajshekhar shared a post on Facebook after BCCI announced Rs 1 crore to cricketer Anshuman Gaikwad.

क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांना बीसीसीआयकडून १ कोटीची मदत जाहीर होताच ‘तुला शिकवीन...’ फेम अभिनेत्याची पोस्ट, म्हणाले, “तंत्रज्ञ कलावंतांसाठी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.