आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांनी नुकतीच शुक्रवारी १२ जुलै रोजी एकमेकांसाठी विवाहगाठ बांधली. या विवाह सोहळ्यासाठी केला गेलेला थाटमाट हा फारच नेत्र दीपक होता. या सोहळ्यात केवळ भारतीयच नव्हे तर परदेशातील मोठमोठ्या दिग्गज व्यक्तींनीसुद्धा उपस्थिती लावली होती. केवळ सिनेसृष्टीतीलच नव्हे तर अनेक देशाविदेशातील राजकीय मंडळीसुद्धा या शाही विवाह सोहळ्यात उपस्थित होते. या विवाहसोहळ्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या लग्नात आलेल्या पाहुण्यांची अंबानींनी चांगलीच खातीरदारी केली. त्यांना येण्या-जाण्यासाठी खाजगी विमानं ते महागड्या भेटवस्तू या सर्व सोयीसुविधा त्यांनी उपलब्ध करुन दिल्या. अनंत आणि राधिका च्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च केल्याचे दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर जिथे तिथे फक्त आणि फक्त अंबारीच्या लग्नाची झलकच पाहायला मिळते. अशातच आता या लग्न सोहळ्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अंबानींनी त्यांच्या खास २५ पाहुण्यांना दिलेले भेटवस्तू पाहायला मिळत आहे.
अनंत अंबानीने शाहरुख, सलमान आणि रणवीर सिंगसह २५ मित्रांना रिटर्न-गिफ्ट म्हणून तब्बल १८ कॅरेट सोन्याचे घड्याळ दिले आहे. ज्याची किंमत सुमारे २ कोटी रुपयांच्या आसपास आहे. रणवीर, शाहरुख त्यांना मिळालेल्या भेटवस्तू फ्लॉन्ट करताना या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अनंत आणि राधिकाचे लग्न १२ जुलै रोजी झाले होते. १३ जुलै रोजी दोघांचा शुभ आशीर्वाद सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला होता.
दरम्यान, मुकेश अंबानी यांनी आपल्या धाकट्या लेकाच्या लग्नात कसलीच कमी भासू दिली नाही. अनेक दिग्गज व बड्या कलाकारांना लेकाच्या लग्नाचे आमंत्रण दिले असून अनेकांनी या लग्नसोहळ्याला खास हजेरी लावत चार चाँद लावले आहेत. राजकारण, मनोरंजन, उद्योग अशा अनेक क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांनी या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली.