शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला माफ करा”, लेकाच्या लग्नानंतर नीता अंबानींनी मागितली माफी, हात जोडत म्हणाल्या, “मला आशा आहे की…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 15, 2024 | 12:38 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
nita ambani on medi

"मला माफ करा", लेकाच्या लग्नानंतर नीता अंबानींनी मागितली माफी, हात जोडत म्हणाल्या, "मला आशा आहे की..."

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला. त्यांच्या विवाहसोहळ्यासाठी जगभरातून अनेकांनी उपस्थिती दर्शवली होती. १२ जुलै रोजी मुंबई येथील जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर येथे या विवाहसोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात केवळ भारतीयच नव्हे तर परदेशातील मोठमोठ्या दिग्गज व्यक्तींनीसुद्धा उपस्थिती लावली होती. केवळ सिनेसृष्टीतीलच नव्हे तर अनेक देशाविदेशातील राजकीय मंडळीसुद्धा या शाही विवाह सोहळ्यात उपस्थित होते. या विवाहसोहळ्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (nita ambani on media)

लग्न झाल्यानंतर १३ व १४ जुलै रोजी दोघांचा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान नीता अंबानी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावेळी व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये त्या मीडिया बरोबर बोलताना दिसत आहेत तसेच त्यांचे आभारदेखील मानताना दिसत आहेत. नीता यांनी मीडियासमोर बोलताना म्हणाल्या की, “तुम्ही इतके दिवस माझ्या अनंत व राधिका यांच्या लग्नासाठी हजर आहात. यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार”.

आणखी वाचा – अंबानींचा नादच नाय! लग्नात आलेल्या पाहुण्यांना दिल्या महागड्या भेटवस्तू, किंमती ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

पुढे त्या म्हणाल्या की, “हे लग्नाचे घर आहे. चुकून काही कमी जास्त झालं असेल तर माफ करा. मला आशा आहे की तुम्ही सर्व आनंदी असाल. तुम्हा सगळ्यांना उद्याचे आमंत्रण मिळाले असेल. उद्या तुम्ही आमचे पाहुणे म्हणून या. मी तुमची वाट बघेन. मी कुटुंबाबरोबर तुमचे स्वागत करेन”. नीता यांच्या बोलण्याने सगळेच जण भारावून गेले होते.

आणखी वाचा – जोडीदार असावा तर असा! कर्करोगाशी झुंज देताना हिना खानच्या बॉयफ्रेंडची तिला खंबीर साथ, अशी घेत आहे काळजी

या दरम्याने नीता यांनी कॅमेरासमोर पोजही दिल्या.  वेडिंग रिसेप्शनच्या दरम्याने नीता यांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती.यावर त्यांनी डायमंड ज्वेलरी, कपाळावर गुलाबी टिकली व हातातील बांगड्यांमुळे त्या खूप सुंदर दिसत होत्या. त्याचप्रमाणे नीता यांनी केसात गजरादेखील माळला होता. यामुळे त्यांचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते.   

Tags: anant ambanimedianita ambaniwedding
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Comedy express fame Marathi actor Ashish Pawar shared his experience of Swami samartha

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला स्वामींची प्रचिती, ‘तो’ प्रसंग सांगताना अभिनेता भावुक, म्हणाला, “गाडीत बसलेलो असताना…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.